पान:गांव-गाडा.pdf/282

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २६१

झालेला, मोडकळीस आलेला, आणि ठालाठेल भरलेला गांवगाडा सफई फसला. तो आतां रिचवून उलगडून पुनः वेठल्याशवाय चालणार नाही.

 गांव-गाड्याच्या सांठीच्याही वर गेलेले हे भरताड आपेआप ओसरेल किंवा हां हां म्हणतां आपलें ठाणे सोडील अशी आशा करण्यांत अर्थ नाही. नवें नवें करणा-या सुशिक्षित पाश्चात्य समाजांत देखील खात्री पटवूनही लोक लवकर जागचे हालत नाहीत व नवीन सुधारणा पत्करीत नाहीत, तर आमच्या रूढिबद्ध आशिक्षित व एकलकोंड्या समाजास सर्व बाजूंनी चलन मिळण्याला पुष्कळच काळ लोटला पाहिजे. तरी पण हे इष्ट स्थित्यंतर घडवून आणण्याला जितक्या तातडीने आपण लागू तितकें बरें. गांव-गाड्यांत आतां अव्वलचा जोम राहिला नाही, तरी 'गांव करील तें रावाच्याने होत नाही' असें कांहीं काही गोष्टींत अजूनही दिसन येतें'. गांवकऱ्यांचा एक विचार झाला तर सध्यांच्या कायदेकानूनी जे काही थोडे फार स्वातंत्र्य गांव-गाड्यांत ठेविलें आहे ते त्याने कामी आणण्याला बिलकुल कचरूं नये. गांवकऱ्यांना स्वतःच्या कर्तुकीवर करता येण्यासारखें जे आहे त्यांत अग्रस्थान फिरस्त्यांच्या गमजा चालू न देणे ह्या कृत्याला दिले पाहिजे.

 परमेश्वर कोणत्या रूपाने येऊन सत्त्व घेऊन जाईल ह्याचा नियम नाही; 'माय मरो पण आस न मरो'; बहुभाग्याने मिळते म्हणून

-----

 १ अहमदनगर जिल्ह्यांत आकोले तालक्यांत बेलापूर गांव आहे. तेथले शेतकरी इतके दक्ष आणि आळेबंद आढळले की, आजूबाजूच्या आलुत्याबलुत्याचा धारा काहीही असेना, त्यांनी आपला आदा व त्यांच्या कामाचें हल्लींचे मान पाहून त्यांत छाटाछाट केली, वाणी लोकांशी उधारीचा व्यवहार बंद केला, आणि गुरवासारख्या पुजारी कारूच्या गळ्यांत चावडी झाडणे, सारवणे व आल्यागेल्या प्रतिष्ठित गांवपाहुण्याची खिजमत करणे इत्यादि कामें घातली. त्यांच्या दक्षतेमुळे गांव इतका सुधारला की, दुष्काळात सुद्धा तो बेबाक राहिला, त्याने १९०६ पर्यंत तगाईचा छदाम उचलला नाही, आणि तेथले कुणबी दोन पैसे बाळगून एकमेकांच्या गरजा वारणारे दिसले.