पान:गांव-गाडा.pdf/265

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४४      गांव-गाडा.

गैरे जाती येतात. व्यभिचारी व गुन्हेगार जाती परजातीतली मुलें लहानपणी विकत घेऊन आपापल्या जातींची भरती करतात. वरिष्ठ जातींतल्या कुमारिकेचे किंवा विधवेचें वांकडे पाऊल पडले तर ह्या जाती तिचं बाळंतपण चोरून करतात, तिला चोळीबांगडी करून वाटे लावतात. आणि मूल ठेवून घेतात. व्यभिचारी जातींत जी मुलगी वाणढाळ असते तिचे लग्न करतात, आणि जी रूपवती असते तिला नायकीण करतात. सदरहु जातींतील पुरुषांचा हा केवढा स्वार्थत्याग आहे बरे? अशी बोलवा आहे की, बहुतेक फिरतें भिकार बदफैली आहे; पण त्यांचे कसब 'मांडी आड' (चोरून) चालतें. जातिधर्म व जातधंदा म्हणून व्यभिचारी जातींतल्या स्त्रिया चव्हाट्यावर पाल ठोकतात; आणि त्यांचे आईबाप चक्क सांगतात की, आमचे वतन कसब व आमची काळी आमच्या मुली. कुटुंबांत जसा एक कर्ता निघाला की त्याला सर्व कुटुंब पोसावे लागते, तसें नायकिणीला आपले आईबाप, भाऊ-भावजया वगैरे पुष्कळ आयतखाऊ गोत पोसावे लागते, व तिचा घरीदारी मोठा बडेजाव असतो. एक कोल्हाटीण म्हणाली की, मी जर धंदा सोडला तर म्हातारपणी आईबाप कोठे जातील व भावांची लग्नकार्यें कशी होतील ?' धंदा अब्रूदार असता तर या मायाळूपणाला मोल नाही. अस्पृश्य जाती व गाढवगोतेशिवाय करून दुसऱ्या कोणत्याही जातींशी वरील जातींच्या नायकिणी धंदा करतात. अशा स्थितीत त्यांना दुर्धर रोग होण्याची, तो पिढ्यानपिढ्या अंगांत मुरण्याची व लोकांत पसरण्याची किती भीति आहे हे आजमावणे कठीण नाही. व्यभिचारी जातींप्रमाणे आमच्यांत सुमारे ६०|७० गुन्हेगार जाती ठरलेल्या आहेत, आणि त्या सर्व जातधर्म व जातधंदा म्हणून हक्कानें गुन्हे करतात. इतर जातींत संपत्तीवर किंवा विद्येवर लग्ने होतात. गुन्हेगार जातींत गुन्हे करण्यांत आणि त्यांप्रीत्यर्थ नाना प्रकारच्या यातना सोसण्यांत जशी ज्याची परीक्षा उतरते, तसा तो नांवालौकिकाला चढतो व त्याप्रमाणे त्याचे लग्न लवकर किंवा उशीरां होतें. 'मनमे चंगा तो काथवटमे गंगा ?' ज्याचें मन ग्वाही देतें की मजकडे बिल-