पान:गांव-गाडा.pdf/109

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८      गांव-गाडा.


पैसे भरतात, व कानांवर हात ठेवून पुरावा लंगडा पाडतात. गांवकामगार पैसे खातात, त्यांतः बहुधा सर्व जातींच्या गांवगुंडांची पाती असते. तरी ह्या बाबतींतल्या खटल्यांत निरक्षरतेच्या सबबीवर कुळकर्ण्यांखेरीज इतरांना निसटून जाण्याला सांपडले. मे. एम्. केनडीसाहेब बहादूर, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, इलाखा मुंबई, ह्यांनी गुन्हेगार जातींसंबंधाने इंग्रजींत पुस्तकः रचिलें आहे; त्यावरून असे समजतें कीं, वंजारे, मांगगारोडी, काथकरी, वाघरी वगैरे जातींच्या चोरट्यांना पाटील लोक मदत करतात. छप्परबंद नांवाचे लोक खोटीं नाणी पाडतात; त्यांना त्यांच्या गांवच्या पाटलाची मदत असते. ती इतकी कीं, ते पाटलांच्या बायकांच्या नांवानें मनिऑर्डरी करतात. बेरड, कैकाडी, भिल, गुजराथ-कोळी, पारधी, रामोशीजातींच्या चोरट्यांना पाटील-कुळकर्ण्यांचे अंग असतो. भामटे लोक पाटील-कुळकर्ण्यांची मूठदाबी करतात, आणि मनिऑडरी व पार्सलें पाटलांच्या नांवाने पाठवितात. असो, वतनदारांचा अवतार मागेच संपला. जोपर्यंत वतनपद्धति आहे तोपर्यंत गांव-गाड्याचा कारभार निर्मल व वक्तशीर होण्याची आशा करणे,म्हणजे ‘मुसळाला अंकुर फुटण्याची’ वाट पहात बसण्यासारखे आहे.

गांव-गाडा.pdf