पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंतु एका बाजूस स्त्री विषयक सर्व सुधारणा व बदल घडत असताना दुस-या बाजूस मात्र समाजातील बुरसटलेल्या पुरूष सत्ताक मनोवृत्तीने विज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्त्रियांना संपविण्याचे कारस्थान सुरू केले आहे. मुळातच हा देश स्त्रियांविषयी दुजाभाव दाखविणारा, तिरस्कार असणारा, स्त्रियांना कमी लेखणारा आहे. स्त्री पासून सुटका करून घेण्यात आणि त्यांचेविषयी मनात हिनता ठेवून हिंसक वागण्यात पुरूषांना पुरूषार्थ वाटतो. याचा परिणाम म्हणून गेल्या २० वर्षात आपल्या देशात गर्भ स्वरूपामध्ये दरवर्षी ५ लाख मुली गायब केल्या गेल्या. ३६ हजाराहून जास्त डॉक्टर या गुन्हेगारीत गुंतलेले आहेत आणि १५०० कोटी रूपयांहून अधिक उलाढाल असणारा गर्भलिंग निदानाचा हा व्यवसाय झाला आहे. अतिशय थंड डोक्याने गर्भातील मुलीचे नातेवाईक व डॉक्टर यांच्या अभद्र युतीच्या आधारे हा नर संहाराचा, स्त्री संहाराचा व्यवसाय सुरू आहे. -: ६