पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरी उपलब्ध कागदपत्रे, आपला जबाब आणि तपासणी समितीला प्रत्यक्ष आढळून आलेल्या त्रुटी आणि त्याबाबतचा समितीचा अहवाल यांच्या आधारे आपण गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत असून सदर तंत्रज्ञानाचा उपयोग आपण पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम ३, ५, १८ व २९ आणि नियम २० व ९ नुसार आपणाविरूद्ध न्यायालयात गुन्हा का दाखल करू नये, याचे उत्तर आपण सदर नोटीस मिळालेपासून ७ (सात) दिवसांचे आत द्यावे. स्थळप्रत राखून ठेवून नोटीस दिली असे. ठिकाण सही - तारीख समुचित प्राधिकार ४) कोर्टात दाखल करावयाच्या तक्रारीचा नमुना ---- येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. यांचे कोर्टात फौजदारी खटला नं. /२०११ डॉ. --- समुचित अधिकारी/वैद्यकीय अधिकारी ---


हॉस्पिटल

पत्ता : ------- विरूद्ध


- --


आरोपी गुन्हे : १) गरोदर महिलेला गर्भाचे लिंग सांगितले - कलम ३ए(६) २) पीसीपीएनडीटी कायद्याच्या पुस्तकाची प्रत सेंटरवर मिळाली नाही - नियम १७(२) ३) एफ फॉर्म भरला नाही - कलम १९, नियम ९(४) ४) डॉक्टरांनी शपथपत्रावर सही केलेली नव्हती - नियम १०(१ए) ५) गरोदर महिलेची संमती घेतली नाही - कलम ५ -: ४६ :