पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३) कारणे दाखवा नोटीसीचा नमुना समुचित प्राधिकारी संबंधीत सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर अगर केंद्राविषयी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे नोटीस न देताही थेट न्यायालयांत गुन्हा दाखल करू शकतात. आवश्यकता वाटल्यास कारण दाखवा नोटीस द्यावी. अन्यथा समुचित प्राधिकारी यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे थेट न्यायालयांत गुन्हा दाखल करावा आणि केंद्राची मान्यता रद्द करावी. नमुना प्रति, नांव - पत्ता - केंद्राचे नांव नोंदणी क्रमांक - यांना - विषय : पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम ३ व १८ नुसार कारणे दाखवा नोटीस महोदय, आपल्या केंद्राची तारीख खालीलप्रमाणे त्रुटी आढळल्या. रोजी तपासणी करणाच्या अधिका-यांना १) ---- २) ----- तपासणी दरम्यान आणि तपासणी केंद्र पथकाच्या आपल्या केंद्राच्या भेटीच्या वेळी आपण हजर होतात. या दरम्यान ............ या गरोदर महिलेची सोनोग्राफी डॉ. .. आपल्या केंद्रावर करताना आढळून आले. आपण सर्व कागदपत्रे नीट ठेवली जातात असे सांगून काही कागद तपासणीसाठी उपलब्ध केले. सदर डॉक्टर आपल्या फिरत्या सोनोग्राफी मशिनह फोनवरून निरोप मिळताच येत असल्याचेही नमूद केले. याबाबत आपला सविस्तर जबाब तपासणी समितीसमोर आपण दिला आहे. -: ४५ :