पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम ३(अ) नियम १२(२) नोंदणी मशिनची नावे सेंटर नोंदवले जाते. याचा अर्थ नोंदणी करताना जागा, तज्ञ व्यक्ती व मशिन्स याची तपासणी | करून सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्राला मान्यता दिली जाते. एका सोनोग्राफी सेंटरवर अनेक मशिन्स असू शकतात. परंतू प्रत्येक मशीन हे नोंदणी प्रमाणपत्रावर नोंदवले गेलेच पाहिजे, अन्यथा न नोंदवलेले मशिन्स नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरवर आढळल्यास गुन्हा दाखल करावा. सदर गुन्ह्यात कंपनीलाही आरोपी करावे. कारवाई दरम्यान ‘Material Object' म्हणून मशिन सील करून जप्त करून शक्यतो कोर्टाच्या ताब्यात स्वतंत्र अर्ज करून द्यावे. जप्त करून सील केलेले मशीन सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्राच्या जागेवरच ठेवल्यास त्यावे सील तोडून गैरवापर होताना आढळले असता पुन्हा गुन्हा दाखल करावा लागतो आहे. मशीन कोणत्याही कारणासाठी कोर्टाकडून मुक्त होवून आरोपीच्या ताब्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. निर्णय मशीन सोडण्याचा झाल्यास अपील त्वरीत करावे. अपिलाचा निर्णय येईपर्यंत मशीन सोडू नये. कोणत्याही कारणासाठी सील केलेले मशीन सोडण्याचा अधिकार हा समुचित प्राधिकारी यांचा नाही तो अधिकार फक्त कोर्टाना आहे. कायद्याचे उल्लंघन आढळल्यास मशील सील, जप्त केले जाते. उल्लंघन आढळल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करावा आणि कोर्टाचा आदेश पाळावा. कलम २३ परस्पर मशीन सील केलेले सोडून दिल्यास समुचित प्राधिकारी आणि ए.सी. च्या स्तरावर कायद्याच्या उल्लंघनाचा ठपका येवू शकतो. वैयक्तिकरित्या जबाबदार धरून गुन्हा दाखल होवू शकतो -: ४१ :