पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलम ३(ब) आणि नियम ३(अ)(१) नियम ३(अ)(२) प्रकरण १२ सोनोग्राफी मशिनबाबतचे नियम नोंदणी नसलेल्या ठिकाणी मशीन विकण्यास अगर वापरण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. अनोंदणीकृत ठिकाणी मशीन अगर गर्भलिंग निदान करू शकणारे कोणतेही साहित्य विकणे, पुरवणे, वापरू देणे, भाड्याने देणे, अधिकार देणे, कब्जा देणेस प्रतिबंध आहे. मशीन/साहित्य पुरवणाच्या व्यक्ती अगर कंपनीने केंद्र सरकार/राज्य सरकारचे समुचित प्राधिकारी यांना प्रत्येक तीन महिन्याने त्या त्या ठिकाणी कोणाला किती मशीन/साहित्य पुरवले याची यादी पाठवणे बंधनकारक आहे. मशीन खरेदी करणाच्या व्यक्तीने सदर मशीनचा वापर गर्भलिंग निदानासाठी करण्यात येणार नाही याची ग्वाही देणारे शपथपत्र बंधनकारक आहे. कायद्याचे उल्लंघन आढळल्यास समुचित प्राधिकारी यांना सदर कामी वापरण्यात आलेले नोंदणीकृत/ अनोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्रावरील सर्व मशीन्स/ साहित्य ताब्यात घेवून पंचनामा करून सील करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक सेंटरने मशीन/साहित्य बदलण्यापूर्वी, विकण्यापूर्वी/ हलवण्यापूर्वी समुचित प्राधिकारी यांना ३० दिवसांच्या आत कळविणे बंधनकारक आहे. सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्राच्या व्याख्येत फिरते मशीन व इतर गर्भलिंग निदान करू शकणारे मशीन/जागा साहित्य अंतर्भूत आहे. नोंदणी प्रमाणपत्र ‘बी’ नमुन्यात द्यावयाचे असून त्यावर कॉलम ३ नुसार मशीन एक अगर अनेक असतील तर त्याचे वर्णन नोंदवणे बंधनकारक आहे. नियम १२(२) -: ४० :