पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम १०(१) नोंदणी तपासणी, कारवाईची सोनोग्राफी सेंटर प्रमाणेच प्रक्रिया जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्रावरही कायद्यानुसार लागू आहे. फक्त त्या ठिकाणी ठेवण्यात येणा-या माहितीचा नमुना फॉर्म वेगळा आहे. कारण होणारी प्रक्रिया व पेशंटची माहिती वेगळ्या प्रकारची आहे. Form 'G' नुसार पेशंटचे समितीपत्र आणि डॉक्टर्सचे शपथपत्र प्रत्येक पेशंटसाठी विहीत नमुन्यात ठेवणे व समुचित प्राधिकारी यांना नियमित पाठवणे बंधनकारक आहे. सल्लागार समिती आणि समुचित प्राधिकारी यांनी ‘या’ केंद्राकडे दुर्लक्ष करू नये. सोनोग्राफी सेंटरप्रमाणेच जनुकीय प्रयोगशाळा/समुपदेशन केंद्र/वंधत्व निवारण केंद्राबाबतही सतत पाठपुरावा ठेवणे, माहिती घेणे बंधनकारक आहे. या ठिकाणी ‘डेकॉय' करणे शक्य आहे. -: ३९ :