पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ जनुकीय प्रयोगशाळा / समुपदेशन केंद्र / वंधत्व निवारण केंद्राबाबत पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा जनुकीय प्रयोगशाळा/ समुपदेशन केंद्र/ वंधत्व निवारण केंद्रांवर बंधनकारक आहे. कलम १८(१)(३) सोनोग्राफी सेंटरप्रमाणेच कायद्यानुसार जनुकीय (४)(५) प्रयोगशाळा/समुपदेशन केंद्र/वंधत्व निवारण केंद्रांची नोंदणी बंधनकारक आहे कलम १९(४) नोंदणी प्रमाणपत्र लावणे बंधनकारक आहे. कलम २०(१)(२)(३) समुचित प्राधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देवून/ अगर न देता/ तक्रारीनुसार/अगर जनहितार्थ स्वत: सदर जनुकीय प्रयोगशाळा/समुपदेशन केंद्र/ वंधत्व निवारण केंद्राची नोंदणी निलंबित / रद्द करण्याचे अधिकार आहेत. नियम ५(१)(अ) जनुकीय प्रयोगशाळा/समुपदेशन केंद्र/वंधत्व निवारण केंद्रची नोंदणी करिता फी रू. ३०००/- आकारण्यात यावी. नियम ९(१) जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्रावर येणाच्या/ होणाच्या प्रक्रियांची विहीत नमुन्यात नोंद ठेवावी. जनुकीय समुपदेशन केंद्रामध्ये Form 'D' मध्ये सर्व पेशंटची सर्व माहिती लिहून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी मागील महिन्याची माहिती समुचित प्राधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. जनुकीय प्रयोगशाळेमध्ये Form 'E' मध्ये सर्व पेशंटची सर्व माहिती लिहून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी मागील महिन्याची माहिती समुचित प्राधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. नियम ९(६) जनुकीय प्रयोगशाळा/समुपदेशन केंद्र/वंधत्व निवारण केंदाने दोन वर्षापर्यंत रेकॉर्ड ठेवावे. कारवाई झाल्यास कारवाईचा निकाल लागेपर्यंत रेकॉर्ड ठेवावे. -: ३८ :