पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन सदस्यांची टीम बनवून ओळखपत्र देवून सर्व सेंटर्स टीमनिहाय वाटून देवून संपूर्ण जिल्ह्याच्या सेंटर्सची तपासणी यंत्रणा उभी करावी. सल्लागार समिती बैठकीत केवळ नोंदणी देत बसण्याऐवजी सल्लागार समितीने तपासणी कामी योदान द्यावे. समिती जबाबदार आणि कार्यक्षम राहण्यास मदत होते. नियमित तपासणी यंत्रणा उभारल्यामुळे कायद्याचा वचक सेंटर्सवर राहतो. समुचित प्राधिका-यांनाही चुकीच्या गोष्टी, भ्रष्टाचार करण्याची संधी राहत नाही. समाजातील प्रमुख लोकांचा सहभाग समुचित प्राधिकारी समितीत आहे आणि त्यांचाच सहभाग तपासणी यंत्रणेत घेतल्यास सेंटर्सवर वचक ठेवण्याचे काम प्रभावीपणे होते. तपासणीसाठी नमुना (Format) बनवावा. नमुन्यानुसार समुचित प्राधिका-यांनी सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्रनिहाय तपासणी अहवाल घ्यावा. त्यावर बैठकीत चर्चा करून कारवाईची पुढील दिशा कायद्यानुसार ठरवावी. सलग तीन बैठकांना गैरहजर राहणा-या सदस्यांना काढून टाकावे. निमंत्रित म्हणून तज्ञ सदस्यांना बैठकीला बोलवता येईल फक्त महत्वाच्या प्रक्रियेत, ठराव मांडणेत सहभाग घेता येणार नाही. सल्लागार समिती कार्यान्वीत, सक्षम केल्यास समुचित प्राधिकारी कामाबरोबर पी.सी.पी.एन.डी.टी. नोंदणी आणि तपासणीचे काम तसेच कारवाईचे काम प्रभावीपणे पारदर्शक पद्धतीने करू शकतात. छापा टाकताना, कारवाई दरम्यान decoy operations मध्येही सल्लागार समिती सदस्यांचा सहभाग घ्यावा. जेणेकरून साक्षीदारही अशासकीय पण जबाबदार -: ३६ :