पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११) नोटा शोधून नंबरप्रमाणे आहेतयाची खात्री करून पंचनामा करून ताब्यात घ्याव्यात. १२) आरोपची चौकशी पूर्ण करून जबाब घ्यावे. १३) सहआरोपींची (इतर पॅरा मेडिकल स्टाफ, एजंट, पी.आर.ओ.) यांचीही चौकशी पूर्ण करून जबाब घ्यावे. १४) सेंटरचे संपूर्ण इन्स्पेक्शन पूर्ण करून महत्वाची संबंधीत सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावीत. जप्ती प्रक्रिया पूर्ण करून सील करावी. १५) मशिन अधिकृत/अनधिकृत सिल करून ताब्यात घ्यावीत. या सर्व गोष्टीचा पंचनामा पूर्ण करून आरोपीस मशिन आणि कागदपत्रे, चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोहोच द्यावी. १६) इन्स्पेक्शन रिपोर्ट पूर्ण करावा. संपूर्ण इमारतीची पाहणी करावी, घर, गॅरेज, हॉस्पिटल सर्व तपासावे. नोंदणी नसलेले मशीन असण्याची शक्यता असते. १७) त्याच ठिकाणी साक्षीदार, गरोदर महिला यांचे जबाब पूर्ण करून कागदोपत्री त्यांच्याकडील पुरावा आणि ऑडिओ, व्हिडीओ कॅसेट ताब्यात घ्यावेत. गरोदर महिला व साक्षीदारांना त्यांच्या जबाबाची प्रत व कॅसेटची कॉपी द्यावी. १८) व्हीडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डंग झाले असल्यास त्यामध्ये कसलाही बदल न करता सीडी बनवून कोर्टाच्या ताब्यामध्ये द्यावी आणि सर्व संभाषण कागदावर लिहून ते दाव्याबरोबर जोडावेत. १९) पत्रकारांना त्याच ठिकाणी घडल्या घटनेची माहिती द्यावी. सर्व तपासणी दरम्यान व्हिडीओ कॅमेरा सुरू ठेवावा. २०) नोंदणी प्रमाणपत्र (मूळ दोन्ही), बोर्ड, 'एफ' फॉम, गरोदर महिलेचे शपथपत्र, डॉक्टरांचे डिक्लेरेशन, ओ.पी.डी. रजिस्टर, जन्म रजिस्टर, कायद्याच्या पुस्तकाची प्रत, रेफरल स्लिपस्, नोंदणीशी संबंधीत कागदपत्रे, सोनोग्राफी मशिन संबंधीत सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावी. समुचित प्राधिकारी यांचेशी झालेला सर्व पत्रव्यवहार ताब्यात घ्यावा. हॉस्पिटल तपासणी दरम्यान संशयास्पद पेशंट, नातेवाईक आढळल्यास त्यांचेही जबाब, नांव, पत्ता संपर्कासह नोंदवावेत. गरज पडल्यास त्यांना चौकशीकामी बोलवावे. -: ३३ :