पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९ बनावट महिला (गरोदर) पाठवून सापळा रचून डॉक्टरांना रंगेहाथ कसे पकडावे? १) १४% आठवडे ते २२ आठवड्याची विश्वासार्ह गरोदर महिला विषयाचे गांभिर्य समाजावून देवून ‘सापळा रचण्याच्या कामी तयार करावे. २) तिच्या नातेवाईकांची (नवरा, सासू, आई) संमती घ्यावी, त्यांचेही काऊन्सिलिंग करावे. ३) सदर महिला सापळा रचण्यासाठी तयार असल्याबाबत ‘अॅफिडेव्हीट' घ्यावे. अॅफिडेव्हीटमध्ये सापळा कामी वापरण्यात येणाच्या नोटांचे नंबर नोंदवावेत व त्या नोटा गरोदर महिला अगर साक्षीदार यांच्या ताब्यात द्याव्यात. ४) तिच्यासोबत पाठविण्यासाठी दोन साक्षीदार तयार करावेत. ५) शक्य असयास ऑडिओ, व्हिडीओ यंत्रणा तयार ठेवावी. तिचे ऑपरेटिंग वगैरे तांत्रिक गोष्टी नीट गरोदर महिला व साक्षीदारांना जमतात हे एकदा वापर करून पहावे. त्याच्या वापरण्याला आत्मविश्वास निर्माण करावा. गोंधळ होणार नाही हे पहावे. ६) प्रमुख तीन साक्षीदार व इतर दोन निरीक्षक तयार करावेत. टीम म्हणून त्यांची चांगली मैत्री असणे आवश्यक आहे. त्यांच्यात अंतर्गत Non-Verbal communication उत्तम हवे. त्यांचे कायदा, सापळा याबाबत व कागदोपत्री पुरावे निर्माण करण्याबाबतचे प्रशिक्षण घेतले जावे. ७) समुचित प्राधिकारी यांनी सदर आपला ज्या ठिकाणी सापळा रचला जाणार आहे त्या सेंटरच्या जवळच उपलब्ध राहावे. ८) पोलीस ठाण्याचे (गरज पाडल्यास) संपर्क नंबर व अधिकारी यांच्याशी समन्वय राहील असे पहावे. गरज पडल्यास स्व-संरक्षणासाठी त्यांना बोलवावे अन्यथा त्यांची आवश्यकता नाही. ९) सापळा यशस्वी झाल्याचे कळताच समुचित प्राधिकारी यांनी आरोपीस स्वत:च्या ताब्यात घ्यावा. १०) त्याला कोणाशी संपर्क साधता येणार नाही अशी व्यवस्था करावी. त्याचे सर्व फोन, वैयक्तिक संपर्क बंद करावेत. -: ३२ :