पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ तक्रार प्राप्त झाल्यास कशी हाताळावी? • तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारदारास त्वरित बोलावून घेवून त्याची सर्व चौकशी करून पुरावे त्याचेकडे असल्यास मूळ प्रतीत आपल्या ताब्यात घ्यावेत आणि त्याला पोहोच द्यावी. • तक्रार निनावी/ फोन कॉल/ संकेत स्थळावर असल्यास संबंधीतांचे फोन नंबरसहीत इतर माहितीची नोंद वेळ, तारखेसह ठेवावी. तक्रारीनुसार संबंधीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत ठिकाणी परिस्थितीनुसार छापा टाकावा अगर नियमित तपासणीचा भाग भासवून तपासणी करावी. तपासणीची सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडून तपासणी अहवाल बनवावा. • कायद्याचे उल्लंघन सदर सेंटरवर आढळल्यास त्वरित नियमानुसार सेंटरची मान्यता निलंबित करावी आणि शोध तपासणी, आणि जप्ती प्रक्रिया पूर्ण करावी. • जाब जबाब नोंदवावेत. पुरावे गोळा करून पंचनामा पूर्ण करावा. • कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून कोर्टात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे गुन्हा दाखल करावा. तक्रारदाराची तक्रार व त्याचा जबाब पुराव्या कामी दाखल करावा. तक्रारदाराची सरकारी साक्षीदार म्हणून नोंद टाकावी. कलम २८(१)(ब) नुसार तक्रार समुचित प्राधिकारी यांना १५ दिवसांची नोटीस देवून संस्था, पत्रकार, व्यक्ती यांच्याकडून आली असल्यास सदर तक्रारीची १५ दिवसांच्या आत नोंद घेवून कारवाई करावी. अन्यथा आरोपीस सहकार्य करत असल्याचा ठपका, समुचित प्राधिकारी यांचेवर येवू शकतो. कलम २४ नुसार गर्भवती महिलेवर गुन्हा दाखल करावयाचा नाही. गर्भवती महिलेस कायद्याने संरक्षण दिले आहे. कलम २३ नुसार कायद्याचे कोणाकडूनही कोणत्याही नियमांचे अगर कलमांचे उल्लंघन केल्यास ३ वर्षे सक्त मजूरी, १००००/- रू. दंडाची शिक्षा आहे. -: ३१ :