पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• शक्यतो बनावट केस/ साक्षीदार यांचे मूळ पत्ते गोपनीय राहतील असे पहावे. त्यांची ओळख आणि पत्ता उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरून त्यांच्यावर आरोपी दबाव आणून/ अमिष दाखवून त्यांना फितूर करणार नाही याची दक्षता घ्यावी. • सर्व प्रक्रिया पूर्ण करताना आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण / मदत घ्यावी. अर्ज करून समुचित प्राधिकारी अशी मदत पूर्व नियोजित / तातडीने मागावू शकतात. • कोर्ट कामकाजा दरम्यानही असे संरक्षण समुचित प्राधिकारी स्वत:साठी, साक्षीदारांसाठी मागवू शकतात. प्रकरणासाठीचा सर्व खर्च पी.सी.पी.एन.डी.टी. खात्यावरील जमा रकमेतून करावा. वेळोवेळी खर्चापूर्वी/अगर नंतर ए.सी. ची मंजूरी घ्यावी त्यासंदर्भात ठराव पास करावा. • ‘गुन्हा निश्चितीकरण' (चार्ज फ्रेम) झाल्यावर लगेच साक्षांकित प्रत घेवून आरोपीची डॉक्टर म्हणून असणारी नोंदणी, निलंबणाचा अर्ज स्टेट मेडिकल कौन्सीलकडे करावा. चार्ज फ्रेम सर्व उल्लंघन झालेल्या व उपलब्ध केलेल्या साक्षी पुराव्यासह सर्व नियम व कलमांसहीत फ्रेम झाल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा चार्ज फ्रेम अल्टरेशनचा अर्ज करून योग्य ते बदल करण्यास विनंती करावी. -: ३० :