पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• नोटीफिकेशन/राजपत्र तक्रार अर्जासोबत मूळ प्रतीत न्यायालयात दाखल करावे. • मशिनसह, जप्त मुद्देमालासंदर्भात स्वतंत्र अर्ज करून सर्व कोर्टाच्या ताब्यात द्यावेत. नोंदणी रद्द केल्याचे पत्र, पंचनामे, जाबजबाब, अर्ज, मूळ तक्रार अर्ज सर्व जप्ती साहित्य सरकारी वकिलांना अवलोकनार्थ द्यावे. खरे तर ही सर्व कायदेशीर प्रक्रिया ही सल्लागार समितीमधील कायद्या तज्ञ/सहाय्यक सरकारी वकील/जिल्हा सरकारी वकील/ विशेष सरकारी वकील यांचे उपस्थितीत आणि मार्गदर्शनानुसार पूर्ण करावी. • दावा दाखल करून केस नंबर घ्यावा. दावा थेट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या अस 3ाप करून हाताळणा-या न्यायालयात समुचित प्राधिकारी यांनीच तक्रारदार या नात्याने दाखल करावयाचा आहे. • अजामीनपात्र गुन्हा असल्याने आपण गुन्हा दाखल करून हाताळणाच्या वकिलांना गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आणून देवून जामीनास विरोध करावा. • मशीन मुक्त होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वत: अगर ए.सी. च्या सल्ल्याने मशीन सोडून देवू नये. कोर्टाकडूनही मशिन सुटणार नाही याची काळजी घ्यावी. सुटल्यास अपील करत राहावे, पण मशिन सोडू नये. सर्व प्रक्रिये दरम्यान प्रकरण खाजगी फौजदारी गुन्हा म्हणून हातळला जातो याची नोंद घ्यावी. तारखेला स्वत: अगर प्रतिनिधी हजर राहतील असे पाहावे वकिलांना केस चालवण्यास सहकार्य देणे. साक्षी पुरावे नीटपणे कोर्टासमोर हजर करून ते नीटपणे मांडले जातील याची काळजी घेणे ही समुचित प्राधिकारी यांची जबाबदारी आहे. • नेमली तारीख लक्षात ठेवून डायरी, रोजनामा नोंदवणे ही समुचित प्राधिकारी यांची जबाबदारी आहे. | सर्व प्रकरणाशी संबंधीत मुद्देमाल, जाबजबाब, पंचनामे, मूळ प्रतीत कोर्टात दाव्याचा भाग म्हणून दाखल करणे बंधनकारक आहे. • दाखल न करणे, अर्धवट पेपर्स दाखल करणे, झेरॉक्स पेपर दाखल करणे योग्य नाही. • असे झाल्यास आरोपीस मदत केल्याची तक्रार होवू शकते. • विषयांचे, गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून प्रकरण हाताळावे अन्यथा साक्षीदार / कोर्ट यांनी गंभीर नोंद घेतल्यास समुचित प्राधिकारी अडचणीत येवू शकतात. -: २९ :