पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ गुन्हा दाखल कसा करावा? • नियमांप्रमाणे शोध आणि जप्ती प्रक्रिया पूर्ण करावी. • सर्व पंचनामे नीटपणे लिहिले आहेत हे पहावे. त्याचा नमूना पंचनाम्याशी संबंधीत फौजदारी दंड संहितेप्रमाणे आहे ना? हे पहावे. • पंच खात्रीशर असावेत. त्यांना विषय समजून देवून गांभीर्य लक्षात आणून देवूनच त्यांची पंच म्हणून सही घ्यावी. • त्वरित संबंधीत आरोपीस सर्व जप्तीची पोहोच देवून त्यांची सही घ्यावी. • त्वरित सोनोग्राफी सेंटरची नोंदणी निलंबित केल्याचे पत्र द्यावे. • संबंधीत आरोपी त्याला मदत करणारे इतर सहआरोपींचे जबाब घ्यावेत. • बनावट केस, साक्षीदार यांचे जबाबही तेथेच पूर्ण करावेत. • बनावट केस व साक्षीदार यांचे जबाबही तिथेच पूर्ण करावेत. बनावट केस व साक्षीदारांचे प्राप्त झालेल्या केसशी/स्टिंगशी संबंधीत पुरावे लेखी (केस पेपर), तांत्रिक (Audio CD) (VCD) (Recordings), रिपोर्ट Prescription इ. ताब्यात मूळ प्रतीत घ्यावेत. • इतर कोणा संबंधीत डॉक्टर, एजंट, हॉस्पिटल, मशिन्सचा मालक, डीलर यांची तपासणी, साक्ष आवश्यक वाटल्यास नोटीस देवून बोलावून अगर संबंधीताच्या हॉस्पिटल, दुकानला/ कामाच्या ठिकाणी भेट देवून तपास घ्यावा. त्यांचेही आवश्यकता वाटल्यास जबाब नोंदवावेत. त्या ठिकाणीही शोध आणि जप्तीची प्रक्रिया कायद्याप्रमाणे पूर्ण करावी. • संबंधीत सेंटरला भेट दिल्याचे नोंदवून Visit Report सह Inspection Report लिहावा. • शक्य झाल्यास त्वरीत वृत्तपत्रांना झाल्या प्रकाराची माहिती द्यावी. • सर्व शोध, तपास, जप्ती, जाबजबाब, पंचनामे, पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर तपशलासहीत त्यावरील आपला तक्रारी अर्ज तयार करावा. तातडीची सल्लागार समितीची बैठक बोलवावी. झाला प्रकार निर्णयासाठी सल्लागार समितीसमोर ठेवावा आणि गुन्हा दाखल करण्याबाबत ठराव घ्यावा. सदर सोनोग्राफी सेंटरची नोंदणी रद्द केल्याचाही ठराव घ्यावा. -: २८ :