पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम १२(१, २, ३) । संहितेनुसार कामकाज करावे. सल्लागार समितीमधील कायदा सल्लागाराचे सहकार्य घ्यावे. समुचित प्राधिकारी म्हणून नेमण्यात आलेल्या तहसिलदार, प्रांताधिकारी यांचीही मदत या कामी घ्यावी. दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थिती कागदपत्रे, सोनोग्राफी मशिस वगैरे गर्भलिंग निदान करू शकणारी साधने, मशिन्स ताब्यात घ्यावीत. ताब्यात घेताना सील करावे. सर्व कागदपत्रे, वह्या, रजिस्टर्स, सर्टिफिकेटस्, जाहीराती, साहित्य, मशिन्स जे जे गुन्ह्याकामी पुरावा म्हणून (तपास करून) सादर करणे आवश्यक वाटते ते सर्व संबंधीत गुन्ह्याच्या ठिकाणाहून शोधून जप्त करावे. जप्त करताना कायद्यानुसार पंचनामा करून सील करावे. स्वतंत्र पण खात्रीशीर पंचांसमक्ष पूर्ण करावी. -: २७ :