पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जप्ती आणि शोध प्रक्रिया (SEARCH AND SEAL) कलम ३०(२), नियम १२ कलम । कलम ३१ समुचित प्राधिकारी यांना कायद्याचे उल्लंघन झाल्याची शंका असल्यास कोणत्याही वेळी सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्रावर जावून शोध घेवून, तपास करून सदर केंद्रावर आढळून आलेली सर्व रजिस्टर्स, कागदपत्रे, मशिन्स इतर वस्तू, कॉम्प्युटर, प्रिंटर, रेकॉर्डंग कमेरा नोंदणी प्रमाणपत्रे, सोनोग्राफी मशिन खरेदीशी संबंधीत सर्व पावत्या व कागदपत्रे ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. फौजदारी दंडसंहिता १९७३ नुसार तपास व जप्ती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे कायद्यानुसार कारवाई केली असता समुचित प्राधिकारी यांचेविरूद्ध कोठेही दावा, गुन्हा दाखल होवू शकत नाही. न्यायाधिश, पोलीस यांच्याप्रमाणे समुचित प्राधिकारी यांना कायद्याने जे संरक्षण दिले आहे, समुचित प्राधिकारी यांना नोंदणीकृत/अनोंदणीकृत सर्व हॉस्पिटल, घर, गाडी, दुकान इ. ठिकाणी प्रवेश करून तपासणीसाठी व जप्तीसाठी सर्व कागदपत्रे, मशिनरी, वस्तू उपलब्ध करणे, संबंधीत केंद्राच्या चालक/मालक /डॉक्टरांना बंधनकारक आहे भारत सरकारने नियम ११(२) काढून टाकला आहे. या नियमानुसार सोनोग्राफी मशिन व सेंटर सील केल्यास पुन्हा उघडून देण्याचे अधिकार समुचित प्राधिकारी यांना होते ते अधिकार रद्द करण्यात आले आहेत. कोणत्याही कारणास्तव सील केलेले सेंटर/मशीन कोर्टाच्या आदेशाशिवाय समुचित प्राधिकारी उघडून देवू शकत नाही. तसे केल्या कायद्याचे उल्लंघन होईल. शोध आणि जप्ती प्रक्रिया पूर्ण करताना फौजदारी दंड नियम ११(१) ८न नियम ११(२) कलम ३०(२) -: २६ :