पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायदंडाधिका-यांकडे दाखल करावा. तत्पूर्वी ३० नुसार Search & Seize the record ची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. तपासणी : • कलम १७(४)(इ) नुसार स्वतः पुढाकार घेवून तक्रार प्राप्त झाल्यास अगर नियिमतपणे कायदा अंमलबजावणीचा भाग म्हणून स्वतंत्रपणे सेंटर्सची अगर शंका असलेल्या ठिकाणांची तपासणी करून कारवाई करण्याचा अधिका समुचित अधिकारी यांना आहे. कलम २०(१) नुसार समुचित अधिकारी यांनी तक्रार प्राप्त झाल्यास अगर स्वतः पुढाकार घेवून कारणे दाखवा नोटीस द्यावी. नोटीसीत सदर केंद्राची मान्यता निलंबित / रद्द का करू नये? याबाबतचे स्पष्टीकरण मागावे. कलम २०(२) नुसार पुरेसा कालावधी नोटीस देवून झाल्याची खात्री पटल्यास सदर प्रकरण सल्लागार समितीच्या सल्ल्यासाठी ठेवून कायद्याचे उल्लंघन झाल्याची खात्री पटताच संबंधीत सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/ जनुकीय समुपदेशन केंद्र विशिष्ट कालावधीसाठी निलंबित अगर रद्द करावे. विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा समुचित प्राधिकारी यांनी त्यांना निलंबन रद्द केल्याचे कळवावे असे नमूद केलेले नाही. • कलम २०(१) आणि (२) मध्ये जरी नमूद केले असले तरी जनहितार्थ समुचित प्राधिकारी यांना कारणे नमूद करून कोणत्याही वेळी, त्वरित नोंदणी निलंबित करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी पूर्व नोटीस देणे बंधनकारक नाही. प्रकरण ६ -: २५ :