पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• नियम ६(७) नुसार सोनोग्राफी सेंटरचा मालक अगर व्यवस्थापन बदलल्यास मालक अगर व्यवस्थापनाने स्वतंत्र अर्ज करावा. • नियम ७ नुसार नोंदणी प्रमाणपत्र ५ वर्षासाठी देण्यात यावे. नियम ८(१) नुसार नुतनीकरणाचा अर्ज फॉर्म ‘ए’ नुसार स्वीकारण्यात यावा. नोंदणी मुदत संपण्यापूर्वी ३० दिवस आधी फॉर्म ‘ए’ नुसार नुतनीकरणाचा अर्ज करण्यात यावा. नियम ८(२) नुसार नोंदणी प्रमाणेच सर्व प्रक्रिया नुतनीकरणाची करण्यात यावी. नियम ८(३) नुसार तपासणी करून अर्जदाराचे म्हणणे ऐकून, सल्लागार समितीसमोर चर्चेसाठी ठेवून समुचित अधिकारी यांना अर्ज नाकारावा वाटल्यास फॉर्म 'सी' नुसार नाकारण्यात यावा. । नियम ८(४) नुसार नोंदणी शुल्काचे निम्मे शुल्क नुतनीकरणासाठी स्वीकारावे. • नियम ८(५) नुसार नुतनीकरण झालेले नोंदणी प्रमाणपत्र अगर नुतनीकरण नाकारलचे पत्र प्राप्त झाल्यावर लगेचच मूळ नोंदणी प्रमाणपत्र समुचित प्राधिका-यांना संबंधीताने त्वरित परत करावेत. • नियम ८(६) नुसार ९० दिवसात नुतनीकरण अगर नुतनीकरण नाकारण्यात आल्याचे न कळविल्यास सदर केंद्राचे नुतनीकरण झाले असे समजण्यात यावे. -: २३ :