पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम ४(२) : नुसार गर्भाचे लिंग कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही परिस्थितीत, कोणालाही सागण्यात येणार नाही, या विहीत नमुन्यातील शपथपत्र असणे बंधनकारक आहे. सदर केंद्रावरती, गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान आणि निवड केली जात नाही अशी नोटीस दर्शनी भागात लावले जाईल. याबाबतचे विहीत नमुन्यातील शपथ अर्जासोबत असते बंधनकारक आहे. • नियम ५(१)(अ) नुसार सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्र यांना रजिस्ट्रेशन फी रू. ३०००/- आणि नियम ५(१)(ब) नुसार हॉस्पिटल, संस्था, नर्सिंग होम अगर इतर ठिकाणी लॅब, क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटर एकत्र असल्यास रू. ४०००/- शुल्क स्वीकारण्यात यावे. | नियम ५(२) नुसार डी.डी.ने फी स्वीकारावी. सदर स्वीकारलेली फी समुचित प्राधिकारी यांचे नावे काढलेल्या पी.सी.पी.एन.डी. च्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी आणि कायद्याच्या अंमलबजाणीसाठी वापरावी. • नियम ६(१) नुसार समुचित प्राधिकारी यांनी प्राप्त अर्जाची छाननी करून तपासणी करून नोंदणीस सदर अर्ज योग्य वाटल्यास सल्लागार समितीसमोर मान्यतेस ठेवणे बंधनकारक आहे. • कलम १९(४), नियम ६(२) : नुसार सल्लागार समितीचा सल्ल्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र विहीत नमुना ‘बी’ नुसार २ प्रतीत द्यावे आणि सेंटरवरती सदर सर्टिफिकेटची एक प्रत लावणे बंधनकारक आहे. | नियम ६(३) नुसार कायद्याला अपेक्षित असणारा रजिस्ट्रेशनसाठीचा अर्ज अपुरा असल्यास सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार समुचित प्राधिकारी सोनोग्राफी सेंटरला रजिस्ट्रेशन नाकारू शकतात. नियम ६(४) नुसार अर्जदारास पूर्व सूचना देवूनच समुचित प्राधिकारी यांनी तपासणीस जावे. नियम ६(५) अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र ‘बी’ फॉर्मच्या स्वरूपात देणे अगर नोंदणी नाकारल्यास फॉर्म ‘सी’ नुसार संबंधीत कळविणे बंधनकारक आहे. नियम ६(६) नुसार नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरीत करता येणार नाही. मालक, व्यवस्थापन, अगर केंद्र बंद करण्याचा निर्णय करण्यात आल्यास मूळ स्वरूपातील नोंदणी प्रमाणपत्रे समुचित प्राधिकारी यांनी पतर घ्यावीत. -: २२ :