पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ - सोनोग्राफी सेंटरची नोंदणी प्रक्रिया समुचित प्राधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स यांचा शोध घेवून कलम १८ आणि १९, नियम ४, ५, ६, ७, ८ नुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. कलम १८ नुसार फॉर्म ‘ए’ प्रमाणे विहीत नमुन्यात समुचित प्राधिकारी यांनी संबंधीतांकडून अर्ज स्वीकारावेत. विहीत नमुन्यात पोहोच द्यावी. तसेच कागदपत्राची पुर्तता नसल्यास अर्जाची नोंद करून अपूर्ण कागदपत्राबाबत संबंधीतास कळवावे कळविताना सदर पोहोच ही नोंदणीसाठी अगर नुतनीकरणासाठी दिलेली नसून अपूर्ण अर्ज पूर्ण केले नंतरच सदर अर्जाचा विचार करण्यात येईल असे विहीत नमुन्यात लिहावे. फॉर्म ‘बी’ नुसार नोंदणी प्रमाणपत्र द्यावे, त्यावर सेंटरचे नांव, प्रकार, कशासाठी नोंदणी देण्यात आली आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती, मशीन किती आणि कशा प्रकारची आहेत त्याचे सविस्तर वर्णन, मशीन आणि प्रोबचे स्वतंत्र वर्णन लिहावे. कधीपर्यंत नोंदणी देण्यात आली आहे, त्याची तारीख नमूद करणे, नोंदणी कधीपासून कधीपर्यंत देणेत आली आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. रजिस्ट्रेशन नंबर देण्यात यावा. फॉर्म ‘सी’ नुसार नोंदणी नाकारण्यात आल्याचे कळवावे सदर ‘सी’ फॉर्म हा नुतनीकरण आणि नवीन सेंटर्स या दोन्हीलाही लागू आहे. सदर ‘सी’ या विहीत नमुन्यात नोंदणी/नुतणीकरण का नाकारण्यात आली त्याची सविस्तर माहिती लिहण्यात यावे. अर्जाबरोबर कायद्यानुसार आवश्यक शुल्काचा चेक/डी.डी. समुचित प्राधिका-यांच्या कार्यालयात जमा झाला पाहिजे, अन्यथा सदर अर्ज हा अपूर्ण समजावा. • कलम १९(१) नुसार अर्ज प्राप्त झालेल्या संपूर्ण अर्जाची तपासणी करून कायद्यानुसार संबंधीत अर्जाची पुर्तता केल्याची खात्री करून घेवून संबंधीत सल्लागार समिती पी.सी. पी.एन.डी.टी. समोर सदर केंद्रास ठराव पास करून मान्यता देण्यात यावी आणि फॉर्म ‘बी’ नुसार नोंदणीपत्र व संबंधीतास अदा करावे. कलम १९(२) नुसार तपासणीअंती केंद्र, नोंदणी अगर नुतनीकरण यास पात्र नाही असे आढळून आल्यास सल्लागार समितीसमोर त्याबाबत चर्चा घडवून आणावी आणि सल्लागार समितीचा ठराव पास करून विहीत नमुन्यात लिखित स्वरूपात कारणे देवून सदर अर्ज विहीत नमुन्यात नाकारावा (फॉर्म ‘सी’) • कलम १९(३) नुसार प्रत्येक नोंदणी प्रमाणपत्र हे कायद्यानुसार विहीत नमुन्यात दिलेल्या वेळेत आणि कायद्यानुसार शुल्क अदा केल्यावरच नुतनीकरण देण्यात यावे. • कलम १९(४) नुसार नोंदणी प्रमाणपत्र हे सर्व केंद्रांवरती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. • नियम ४(१) : सदर केंद्रावर गर्भलिंग निदान केले जाणार नाही. -: २१ :