पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अधिकार देणेत आले आहेत. सदर कायद्याचे कलम २८(१ए) नुसार समुचित प्राधिकारी यांना तक्रारदार या नात्याने गुन्ह्याची चौकशी पूर्ण करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात गुन्हा दाखल करावयाचा आहे. कलम २०(१) अन्वये समुचित प्राधिकारी यांना कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस देणेचा अधिकार आहे. याचाच अर्थ समुचित प्राधिकारी हेच सदर कायद्यानुसार दिवाणी न्यायाधिशाइतके सक्षम अधिकारी आहेत. सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीसांकडे जाण्याची आवश्यकता नाही. गरज भासल्यास पोलीस संरक्षण मागवू शकतात. -: २० :