पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९(२,३,४) नियम ९(५) नियम ९(६) नियम ९(८) नियम १७/१ नियम १७/२ जनुकीय प्रयोगशाळेने फार्म इ आणि समुपदेशन केंद्राने फॉर्म डी भरावयाचा आहे. समुचित प्राधिकारी यांनी नोंदणीकृत सर्व केंद्रांची माहिती ही फॉर्म एच नुसार भरणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे गुन्हा दाखल झाल्यास, निकाल लागेपर्यंत अन्यथा दोन वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावयाची आहेत. सोनोग्राफी सेंटर, जनुकीय प्रयोगशाळा, जनुकीय समुपदेश केंद्र यांनी त्या ठिकाणी सर्व पेशंटच्या तपासणीचा अहवाल विहीत नमुन्यात (डीइएफ फॉर्म) प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत समुचित प्राधिकारी यांच्याकडे पाठवावयाचा आहे. सोनोग्राफी सेंटरवर येथे गर्भ लिंगनिदान केले जात नाही हे सांगणारा स्थानिक भाषेतील आणि इंग्रजी भाषेतील बोर्ड दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सदर कायद्याचे पुस्तक इंग्रजी व स्थानिक भाषेत संबंधीत सोनोग्राफी सेंटर, जनुकीय प्रयोगशाळा, जनुकीय समुपदेश केंद्रावर ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. समुचित प्राधिकारी यांनी संबंधीत सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा इ. बाबतची सर्व माहिती, त्यांचा अहवाल, करण्यात आलेली कारवाई, वेळोवळी जनतेसाठी जाहीर करणे आणि तज्ञांना ती उपलब्ध करून देणे त्यांचेवर बंधनकारक आहे. (१) समुचित प्राधिकारी यांना कायद्याचा भंग आढळून आल्यास संबंधीत नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर/ जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्रावर छापा टाकून सर्व कागदपत्रे, साधने, मशिन्स तपासून शोधून, सील करणेचा अगर जप्त करणेचा अधिकार आहे. (२) त्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ नुसार कार्यवाही करणेत यावी. संबंधीतांनी समुचित प्राधिकारी यांना केंद्राची जागा, साधने व सर्व कागपत्रे सर्व वेळेस तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नियम १७/३ नियम ३० नियम ११ नियम ३१ कायद्याचे अंमलबजावणीसाठी समुचित प्राधिकारी यांनी -: १८ :