पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलम २१ कलम २२ ३. वर कलम १ व २ मधील उल्लेख न घेता, समुचित प्राधिकारी हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणतीही पूर्व सूचना न देता त्वरित सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा यांची नोंदणी रद्द करू शकतात. अपील समुचित प्राधिकारी यांच्या निर्णयाविरूद्ध संबंधीतांना राज्य समुचित प्राधिकारी यांच्याकडे व नंतर केंद्र समुचित प्राधिकारी यांच्याकडे अपील करता येते. गर्भ लिंग निदान व निवडीबाबत जाहीरात करण्यास बंदी आहे. छापील पत्रकाद्वारे, संवादाद्वारे अगर एस.एम.एस., फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जाहीरात करण्यास बंदी आहे. जाहीरात म्हणजे नोटीस, सक्युलर, लेबल, ऍम्पर वगैरे. सदर कलम २२ चा भंग झाल्यास संबंधीतास ३ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रूपये दंडास पात्र राहतील. गुन्हा व शिक्षा १. कोणतेही सोनोग्राफी सेंटर, दवाखाना, हॉस्पिटल, जनुकीय प्रयोगशाळा अगर जनुकीय समुपदेशन केंद्राने सदर कायद्याचे कलम अगर नियम यांचा भंग केला तर त्यास ३ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रूपये दंड पहिल्या गुन्ह्यासाठी ठोठावण्यात येईल. दुस-यांदा पुन्हा तोच गुन्हा घडल्यास ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल. कलम २२(३) कलम २३ २. आरोप निश्चितीनंतर (चार्ज फ्रेम) संबंधीत गुन्हेगाराचे नांव स्टेट मेडिकल कौन्सिलवरून तात्पुरते निलंबित करणेत येईल व शिक्षा झाल्यास ५ वर्षासाठी निलंबित करण्यात येईल व पुढील गुन्हा घडल्यास कायमस्वरूपी नोंदणी रद्द करण्यात येईल. ३. सदर गर्भलिंग निदान व निवडीची सेवा मागणाच्या -: १६ :