पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम ६-२ नियम ६-६ लावणेत यावे. सोनोग्राफी नोंदणी प्रमाणपत्राचे हस्तांतरण करता येणार नाही नियम ६–७ नियम ७ नियम ८ कलम १९(१)(२) सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा यांची जागा, मालकी, व्यवस्थापन, मशिन्स यात कोणताही बदल झाल्यास नोंदणीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा यांचे नोंदणी प्रमाणपत्र पाच वर्षासाठी राहील सोनोग्राफी सेंटरच्या नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी ३० दिवस अगोदर नोंदणी नुतनीकरण करण्यासाठी समुचित प्राधिकारी यांच्याकडे संबंधीतांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण करून सोनोग्राफी सेंटर, जुनकीय प्रयोगशाळा व जनुकीय समुपदेशन केंद्र सल्लागार समितीच्या संमतीने नोंदणीकृत करणेत यावी. चौकशी दरम्यान सदर सेंटर नोंदणी योग्य न वाटल्यास, अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेवून सल्लागार समितीच्या निर्णयानंतर तशी नोंद टाकून नोंदणी अर्ज नामंजूर करणेत यावा. नोंदणी प्रमाणपत्र बरखास्त किंवा रद्द करणे. १. संयुक्तिक कारण देवून समुचित प्राधिकारी स्वतः किंवा तक्रारीच्या आधारे संबंधीत केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र का रद्द करणेत येवू नये, अशी विचारणा कारणे दाखवा नोटीसीद्वारे करू शकतील. २. सोनोग्राफी सेंटर, जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा यांचे म्हणणे ऐकून घेवून सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार, केंद्राने कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याबाबत पूर्वग्रह न बाळगता केंद्राचे प्रमाणपत्र विशिष्ठ कालावधीसाठी किंवा पूर्णपणे निलंबित (सस्पेंड) अगर रद्द करू शकतात. कलम २० -: १५ :