पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम १५ कलम १८ आलेले समुचित प्राधिकारी आहेत. त्यांची नेमणूक ही समुचित प्राधिकारी म्हणून पदसिद्ध अशी सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर समुचित प्राधिकारी यांना कायद्याचे अंमलबजावणीची मदत करण्यासाठी त्यांच्यासह सात सदस्यांची सल्लागार समिती आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील ३ सदस्य, स्त्री रोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ञ, बालरोग तज्ञ, मेडिकल जेनेटिक, कायदातज्ञ, माहिती अधिकारी, तीन सामाजिक कार्यकर्ते (महिला संस्थांना प्राधान्य द्यावे) असावेत. सदर सल्लागार समितीची बैठक ही दर दोन महिन्यांनी घेणे बंधनकारक आहे. सोनोग्राफी सेंटरच्या नोंदणीबाबत १. नोंदणीशिवाय कोणतेही सोनोग्राफी सेंटर, प्रयोगशाळा अगर समुपदेशन केंद्र यांना काम करण्यास बंदी आहे. २. विहीत नमुन्यात (फॉर्म ए) शुल्क (फी) भरून समुचित प्राधिकारी यांचेकडे नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे. सोनोग्राफी केंद्रावर “येथे गर्भलिंग निदान केले जात नाही” असा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. नोंदणी दरम्यान जनुकीय समुपदेशन केंद्रास व प्रयोगशाळेस ३,००० /- रूपये नोंदणी शुल्क, सोनोग्राफी सेंटरला ४००० रूपये नोंदणी शुल्क आकारणेचे आहे. अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांचे आत त्याबाबतचा निर्णय संबंधीतांना कळविणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी शुल्क समुचित प्राधिकारी यांनी बँकेत स्वतंत्र खाते काढून जमा करावयाची असून ती रक्कम सदर कायद्याचे अंमलबजावणीसाठी वापरावयाची आहे. नियम ४-१-(२) व १७(१) नियम ५-१ व २ कलम १९(४), सोनोग्राफी सेंटरचे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात -: १४ :