पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलम ५(२) अ,ब,क संबंधीत गर्भवती महिलेची सर्व कागदपत्रे विहीत नमुन्यात ठेवण्याची जबाबदारी ही संबंधीत सोनोग्राफी सेंटर चालक व मालक यांची राहील. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास कलम ५ व ६ चा भंग केल्याचा गुन्हा दाखल करणेत येईल व तो शाबीत करण्याची जबाबदारी ही संबंधीत सेंटरचे चालक व मालक यांची राहील. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यापूर्वी तिचे सदर प्रक्रियेबाबत समुपदेशन करावे. तिला समजेल अशा तिच्या मातृभाषेतील सही घेणे व ती गर्भ लिंग निदान करून घेण्यास आलेली नसून ती तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी सोनोग्राफी करीत असल्याचे विहीत नमुन्यातील संमती पत्र घ्यावे. सदर संमतीपत्र हे तिला समजेल अशा तिच्या मातृभाषेत असणे बंधनकारक आहे. त्याची एक प्रत संबंधीत गर्भवती महिलेस देणे कायद्याने बंधनकारक आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यापूर्वी संबंधीत डॉक्टरांनी मी गर्भाचे लिंग संबंधीत महिलेस सांगणार नाही असे वचन पत्र तारीख व वेळ अचुक टाकून डॉक्टरांनी भरावयाचे आहे. सोनोग्राफी सेंटर, जनुकीय प्रयोगशाळा अगर जनुकीय समुदपदेशन केंद्रावर सदर डॉक्टरांनी अगर त्यांच्या प्रतिनिधीने शब्दाने, खाणाखुणांनी अगर चिन्हाने गर्भलिंग सांगण्यास प्रतिबंध केला आहे. समुचित प्राधिकारी आणि त्यांची सल्लागार समिती यांच्या विषयाचे नियम घालून दिले आहेत. सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्धी करून एक किंवा अनेक समुचित प्राधिकारी नेमण्याची सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात सिव्हील सर्जन व ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिक्षक तसेच महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी हे सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात रूल १०(१)(ए) कलम ६ कलम १७ -: १३ :