पान:गद्यरत्नमाला.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
गद्यरत्नमाला.


कण्व तो तर ब्रह्मचारी आहे असें म्हणतात, साक्षात् धर्ममुद्धां आपले व्रत सोडील, परंतु हा सोडणार नाहीं. असें असून तूं त्याची मुलगी म्हणवितेस हें कसें ?
 शकुंतला - ' माझ्या जन्माविषयीं मागें एका ऋषीनें विचा- रिलें, तेव्हां ऋषिश्रेष्ठानें त्यास सांगितलें तेंच मी तुम्हांस सांगतें. '
 कण्व - " पूर्वी विश्वामित्रानें फार भयंकर तपश्चर्या केली तेव्हां हा आपणापेक्षां तेजस्वी होऊन कदाचित् आपलें पदसुद्धां घेईल असा इंद्रास धाक पडला. तेव्हां मेनकानामक स्वर्गी- तील अप्सरेस इंद्रानें विनंति केली कीं, तूं जाऊन ऋषीला भुलवून त्याची तपश्चर्या भग्न करून टाक. "
 मेनका - "महाराज, विश्वामित्र महातेजस्वी व रागीट हैं। आपणासहि माहित आहे. ज्याने एवढ्या मोठ्या वसिष्ठाचे सुद्धां शंभर पुत्र मारविले, जो क्षत्रिय असतां बलात्कारानें ब्राह्मण झाला; नीच जातीच्या घरी यज्ञ करीत असतांहि त्याच्या भयानें आपण सोमपान करण्यास गेलां; ज्याने प्रतिसृष्टि केली; गुरूचा शाप झाला असतांहि ज्यानें त्रिशंकूचे रक्षण केलें अर्शी ज्याचीं कृत्ये व ज्यास आपण भितां त्याच्यापुढे माझें सामर्थ्य काय चा- लणार? तो मला कोपाने जाळून टाकील. तो आपल्या प्रभा वानें त्रैलोक्यसुद्धां कांगवील. त्याकडे माझ्यासारख्या बायकोनें जाणे म्हणजे केवळ अग्नींत उडी घातल्याप्रमाणें आहे. यम, सोम, इत्यादि देव महान् महान् ऋपिहि ज्यास भितात त्याचें माझ्यासारख्या बायकोस किती भय वाटावें ? तथापि आपण सांगितले त्या अर्थी मला जाणें प्राप्त आहे. परंतु माझ्या रक्ष- णाची तजवीज करावी. मी त्याजवळ जाऊन खेळू लाग म्हणजे वनांतून सुगंधी वायु यावा, असें झाल्यास ऋस भुल- विण्याची तजवीज करितें. " इंद्रानें इतकें साहाय्य देण्याचें कबूल केल्यावर मेनका विश्वामित्राच्या आश्रमास गेली.
 मेनका तिकड़े गेल्यावर इंद्रानें वायु व मदन यांस तिजबगे-