पान:गद्यरत्नमाला.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शकुंतलेची गोष्ट.

९३


बर जाण्यास सांगितलें. मेनका भयानें कांपत कांपत महापुण्य- वान् विश्वामित्राच्या जवळ गेली; आणि त्याला वंदन करून कं- दुकक्रीडा करूं लागली. इतक्यांत वायु आणि मदन यांनी मेनकेनें इंद्रापाशीं मागितल्याप्रमाणें साहाय्य केलें; तेव्हां विश्वा- मित्र ऋषि भुलून गेला. नंतर उभयतांची प्रीति जमल्यावर मेनका गर्भिणी होऊन प्रसूत झाली. तेव्हां मालिनी नदीच्या तीरीं बालक ठेऊन इंद्राच्या सभेस गेली.
 इकडे सिंहव्याघ्रांनी युक्त अशा भयंकर अरण्यांत टाकलेल्या बालकास पाहून पक्ष्यांनी भोंवतीं जमून त्याचें रक्षण केलें. एके दिवशीं मी नदीवर ब्रह्मयज्ञ करण्यास गेलों तेव्हां ओसाड अर- यांत हिला पाहून घरी आणून आपल्या मुलीप्रमाणे बाळगिली. कारण, उत्पन्न करणारा, प्राण देणारा, आणि अन्न घालणारा, हे तिन्ही बापच आहेत. निर्जनवनांत शकुंतांनी ( पक्ष्यांनी ) हिचें रक्षण केलें म्हणून हिचें नांव शकुंतला असें ठेविलें. याव रून मला हिचा बाप व ही माझी मुलगी असें म्हणतात.
 शकुंतला - हे राजा, याप्रमाणे महर्षीनीं सांगितलें, तें मीं तुम्हांस विदित केलें. मला माझा पिता कोण तें ठाऊक नाहीं. मी कण्वासच आपला पिता मानितें.
 दुष्यंत- हे राजपुत्रि शकुंतले, त्वां सर्व वृत्तात सांगितला हा खरा आहे. ( कारण मनुष्यापासून असें रूपयुक्त अपत्य होणे कठीण. ) आतां तूं माझी बायको हो. सर्व मनोरथ तुझे पूर्ण करीन. सुवर्णाचे अलंकार, रत्ने, उत्तम उत्तम वस्त्रे, तुला देईन. फार काय, पण सर्व राज्य तुझें आहे. गांधर्वविवाद हा सर्वात श्रेष्ठ आहे. तर त्या विधीने आज तूं माझी पत्नी हो.
 शकुंतला - राजा, माझा पिता फळें आणण्याकरितां आश्र मापासून बाहेर गेला आहे; याकरितां दोन घटिका वाट पहा, तो आल्यावर मला तुला देईल.
 दुष्यंत- - मी तुजकरितां येथें थांवलों आहे; माझें मन तुज -