पान:गद्यरत्नमाला.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शकुंतलेची गोष्ट.

८७


मुक्त होतो. पुनः असें करणार नाहीं असा निश्चय करून जर तो त्यापासून निवृत्त झाला तर तो शुद्ध होतो. असा विचार करून मरणानंतर शुभदायक असेल तें सत्कर्म, मन, वाणी, शरीर यांनीं सर्वदा करीत असावें.
 न समजून अथवा कदाचित् समजूनहि निंद्य कर्म केलें असतां त्यापासून सुटण्याची ज्याची इच्छा असेल, त्यानें पुनः दुसऱ्याने तसे करूं नये.
 इंद्रियांच्या संबंधानें आणि अधर्माचरणाने मूर्ख लोक संसार- यातना भोगितात. वाणीचा निग्रह, मनाचा निग्रह आणि शरी- राचा निग्रह, हे तीन निग्रह सर्व भूतांविषयीं धारण करून काम आणि क्रोध यांचे आकलन केलें असतां मनुष्य परमार्थप्रत पावतो.

शकुंतलेची गोष्ट.


 भरतखंडाचा प्राचीन काळापासून विश्वसनीय इतिहास नाहीं. तथापि आर्यलोकांची पूर्वस्थिति कळण्यास बहुत साधने आहेत. त्यांपैकीं मुख्य म्हटले म्हणजे संस्कृत भाषेतील ग्रंथ, वेद, स्मृति, पुराणे, यांपासून प्राचीन काळची स्थिति कळते. तथापि प्राचीन इति- हासाचे ज्ञान होण्यास महाभारतासारखा दुसरा ग्रंथ उत्तम नाहीं. कारण, या ग्रंथांस इतिहास हैं नांव दिलेले आहे. पुष्कळ काळ गेल्यामुळे यांत सांगितलेल्या कित्येक गोष्टी अत्युक्ती सारख्या वाट- तात, यांत आश्चर्य नाहीं. तथापि प्राचीन आर्य लोकांची धर्म- संबंधानें स्थिति, त्यांची विद्वत्ता, त्यांची गृहस्थिति, त्यांची संपत्ति, त्यांचे युद्धकौशल्य, त्यांच्या रोतिभाती इत्यादि गोष्टी कळण्यास श्रीमहाभारत ग्रंथ फार उत्तम आहे यांत संशय नाहीं. त्यांत कित्येक गोष्टी मनोवेधक आहेत. शकुंतलेची प्रसिद्ध गोष्ट मूळ महाभारतांतच आहे. ती प्रसिद्ध कवि कालिदास यानें केलेल्या शाकुंतलनाटकामुळे फार प्रसिद्ध आहे. यांत ही गोष्ट मुख्य ध