पान:गद्यरत्नमाला.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
गद्यरत्नमाला.


राजास प्रजा आपल्या ताब्यांत ठेवितां येते. जो राजा मूर्खपणानें प्रजेच्या हिताकडे न पाहतां तिला पीडा देतो, तो राज्यापासून च्युत होऊन पुत्रवधवांसहवर्तमान नष्ट होतो. शरीरास पीडा झाली म्हणजे मनुष्याच्या जीवास पीडा होते, तसेच राष्ट्राच्या दुःखानें राजाचा नाश होतो.
 धर्म एवढाच एक खरा मित्र होय; कारण, तो मरणानंतर हि बरोबर येतो; बाकी सर्व शरीराबरोबर नाश पावतें.
 आपला आत्मा हाच आपला साक्षी, हाच आपणास वाट दाखविणारा, मनुष्याचा उत्तम साक्षी हाच होय. याकरितां ( अ- सत्य भाषणादि करून ) त्याचा अपमान करूं नये.
 पाप करणान्यांस वाटतें कीं आपलें पाप कोणी पहात नाहीं, परंतु त्यांस देव पहात असतो; व त्यांचा आत्माहि पहात असतो. बोलत असतां ज्याचा अंतरात्मा भीत नाहीं, तो सर्वामध्ये श्रेष्ठ असे देव समजतात.
 दुःखितांनी निंदा केली असतां जो सहन करतो, तो स्वर्ग- लोकीं मान्य होतो. जो ऐश्वर्यमदानें क्षमा करीत नाहीं तो नरः कास जातो.
 नदी समुद्रास मिळाली म्हणजे त्यासारखी होते त्याप्रमाणे जसा नवरा मिळेल त्याप्रमाणें बायकोचा स्वभाव बनतो. मुलें. बाळें व त्यांचं रक्षण, रोजचें जेवणखाण, वगैरे या सर्वांस बायका मुख्य कारण होत.
 अहिंसा, सत्य, अस्तेय ( चोरी न करणें ), शुचिर्भूतपणा, इंद्रियनिग्रह, हा सामान्यतः सर्व वर्णाचा धर्म होय, असें मनु ह्मणतो.
 विहित ( म्हणजे योग्य कर्म ) न करणारा, व निंदित कर्म करणारा, इंद्रियार्थ म्हणजे विषय यांचे ठिकाणी तत्पर असा जो मनुष्य तो प्रायश्चित्तास पात्र होतो.
 पाप केलें असतां ज्यास पश्चात्ताप होतो, तो त्या पापापासून