पान:गद्यरत्नमाला.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुस्मृति.

८३


 जें परस्वाधीन तें दुःख, जें स्वाधीन तें सुख, हें थोडक्यांत सुखदुःखांचें लक्षण समजावें.
 जें कर्म करितांना मनाचा संतोष होईल तें यत्नानें करावें, याच्या विपरीत असेल तें टाकावें.
 पुत्र, शिष्य, यांशिवाय इतरांवर काठी उगारूं नये. राग आला तरी मारूं नये. शिक्षणापुरतें मात्र पुत्र व शिष्य यांचें ताडन करावे.
 जो मनुष्य धार्मिक नाहीं, लवाडी हेंच ज्याचें भांडवल, हिंसा करणारा, त्यास सुखप्राप्ति होत नाहीं.
 अधार्मिक, पापी, यांचा नाश होतो, हें पाहून धर्माचरण करितांना दुःख प्राप्त झालें तरी अधर्म मनांत आणूं नये.
 जमिनींत बीज पेरलें असतां लागलेच उगवते, तसे अधर्माचरण फल लागलेंच येतें असें नाहीं, तर हळूहळू परिपक्क होऊन क- र्त्यांचा समूळ नाश करते.
 सत्यधर्म, साधूचें आचरण, स्वच्छपणा, यांची आवड धरावी. शिक्षेस पात्र असतील त्यांस शिक्षा करावी. वाणी, हात, उदर ह्रीं स्वाधीन ठेवावी. ( भाषणानें, हातानें, अथवा भक्षणाकरितां कोणास पीडा देऊं नये. )
 ज्यांत धर्म नाहीं, असे अर्थ आणि काम असतील ते टाकावे, ज्यापासून पुढे दुःख होईल, अथवा जो लोकविद्विष्ट असेल ( उ- दाहरण – दरिद्र्यानें आपल्या बायकामुलांची पर्वा न करितां दुसन्यास सर्वस्व देणें, इत्यादि ) असा धर्महि करू नये.
 ज्या मार्गानें बाप, आजा बगैरे पूर्वज चालत आले, असा जो साधूंचा मार्ग त्यानें चाललें असतां दोष लागत नाहीं.
 मुंग्या ( थोडथोडी माती आणून ) वारूळ करितात त्यांप्र- मानें हळूहळू नेहमीं प्राणिमात्रांस दुःख दिल्याशिवाय परलोकीं उपयोगाकरितां धर्माचा (पुण्याचा ) संचय करावा.
 परलोकीं उपयोगाकरितां आईबाप कोणी येत नाहींत. मुलगा