पान:गद्यरत्नमाला.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
गद्यरत्नमाला.


 घरी अतिथि आला असतां, त्यास आसन उदक द्यावें; व यथा- योग्य सत्कार करून यथाशाक्त खाऊं घालावें. सायंकाळीं अतिथि आला असतां, गृहस्थानें त्यास जा म्हणून सांगूं नये. वेळीं अवेळी केव्हांहि अतिथि आला तरी त्यास गृहस्थानें आपल्या घरी उपाशी ठेवू नये.
 जे मूर्ख आपण गृहस्थाश्रमी असून लोभानें परान्नाचे सेवन करतात ते मेल्यानंतर अन्नदात्याचे पशु होतात.
 तृण, राहण्यास जागा, पाणी, गोड बोलणें, हीं चार कुलीन मनुष्य कोणासहि नाहीं म्हणत नाहींत.
 मुखाची इच्छा करणान्याने संतोष धारण करून जितेंद्रिय व्हावें. सुखाचें मूळ संतोष होय. तसेंच दुःखाचें मूळ असंतोष. आपल्या वयाला, कर्माला, द्रव्याला, विद्येला, कुलाला, बोल- ण्याला, बुद्धीला योग्य असें आचरण करावें.
 जसजसे मनुष्यास शास्त्र अधिक समजूं लागतें, तसतसें त्याचे ज्ञान वाढतें आणि ज्ञान त्यास आवडूं लागतें.
 दरिद्री आहों ह्मणून आपला आपण अवमान कधीं करूं नये. शेवटपर्यंत लक्ष्मीची इच्छा करावी. ती दुर्लभ आहे असें मानूं नये.
 खरें बोलावें, गोड बोलावें, खरें असले तरी कडू बोलू नये. गोड असले तरी खोदें बोलू नये. हा सनातन म्हणजे नित्य धर्म होय.
 व्यंग, अधिकांग ( अंगावर अवाळं वगैरे असलेले ), विद्या- हीन, म्हातारे, कुरूप, दरिद्री, नीचकुलांत जन्मलेले, यांची निंदा करूं नये.
 दुराचारी माणसांची लोक निंदा करतात, त्यास दुःख मात होतें, रोग होतात, त्याचें आयुष्य कमी होतें.
 शहाण्याने जें परस्वाधीन तें यत्नानें सोडून द्यावें, जे स्वाधीन असेल तें करावें.