पान:गद्यरत्नमाला.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
गंद्यरत्नमाला.


नाहीं, बायको नाहीं, भाऊबंद नाहींत, केवळ धर्म मात्र उभा राहतो.
 जीव गेला म्हणजे मातीच्या ढेकळांप्रमाणे अथवा लांकडाच्या धलपीप्रमाणे शरीर जमिनीवर फेंकून देऊन भाऊबंद परत जा. तात. धर्म मात्र बरोबर राहतो. याकरितां सोबती मिळावा म्हणून सर्वकाळ थोडथोडा धर्मसंचय करावा. धर्मरूप मित्राचे योगानें भयंकर दुःखांतून मनुष्य पार पडतो.
 ज्यास आपल्या कुळाचा उत्कर्ष करणें असेल, त्यानें नेहमी उत्तमांशी संबंध ठेवावे. हलक्याशीं संबंध ठेवू नये.
 निश्चयाचा बळकट, स्वभावानें मृदु, जितेंद्रिय, दुष्टांशीं सह- वास न करणारा, हिंसा न करणारा, असा होऊन, मनुष्यानें इंद्रियजय व दान यांचे व्रत धरून स्वर्ग जिंकावा.
 सर्व व्यवहार वाणीपासून उत्पन्न झाले आहेत. वाणींतच ते राहतात. वाणीमुळेंच ते नियमित चालतात. अशा वाणीप्रत जो चोरतो, (असत्य भाषण करतो, ) तो सर्व वस्तु चोरणारा होय. स्त्रीने सर्वदा आनंदित असावें, गृहकार्यामध्यें दक्षता ठेवावी, घरांतील वस्तूंची व्यवस्था नीट ठेवावी, कृपणपणा करूं नये.
 मन, वाणी, शरीर, इत्यादिकांनीं जी पतचिं उल्लंघन करीत नाहीं, ती भर्त्याबरोबर स्वर्गास जाते, आणि पतिव्रता अशी तिची लोकांत कीर्ति होते.
 लोक अपशब्द बोलले तरी आपण सोसावे. कोणाचा अप मान करूं नये; देह क्षणभंगुर आहे. असें समजून कोणाशीं वैर करूं नये.
 इंद्रियें स्वाधीन ठेविल्यानें, विषयवासनांच्या क्षयानें, आणि प्राण्यांच्या अहिंसेनें मनुष्य मोक्षास पात्र होतो.
 हाडांनी फुगलेलें, स्नायूंनीं बांधलेले; मांस आणि रक्त यांनी लेपटलेलें; कातड्यानें गुंडाळलेले; दुर्गंधि, मूत्रपुरी पानें भरलेलें, जरा आणि शोक यांनी युक्त; रोगांचे घर; क्षुधादिकांनी पीडित, घाणेरडें; अनित्य, असें हें शरीर सोडावें. ( म्हणजे ह्या पंच-