पान:गद्यरत्नमाला.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुस्मृति.

૮o


त्याप्रमाणे सर्व इंद्रियांतून एक जरी विषयासक्त झालें तरी तद्वारा मनुष्याचे सर्व ज्ञान नष्ट होतें.
 शरीराला पीडा न देतां इंद्रियसमुदाय स्वाधीन ठेऊन व मनाचा निग्रह करून सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावे.
 जो कोणी थोडी बहुत विद्या शिकवील त्यास तेवढ्याच उप- कारानें गुरु असें मानावें.
 केंस पिकले म्हणजे मनुष्य झातारा झाला असें नाहीं. तरुण असूनहि जो विद्वान् त्यास देवहि वृद्ध समजतात.
 आपणास पीडा झाली तरी दुसन्याचे मर्म काढू नये. ज्या भाषणानें दुसन्यास पीडा होते तें भाषण स्वर्गगतीस प्रतिकूल होय, तें बालू नये.
 आपल्या गुरूचे दोष कोणी बोलत असेल अथवा त्यांची उगाच कोणी निन्दा करील तर त्या ठिकाणीं कानावर हात ठेवावे, अथवा तेथून उठून जावें.
 कोणत्याही स्त्रीपाशीं एकांतीं बसूं नये. कारण इंद्रिये बळकट आहेत, तीं विद्वानांस सुद्धां ओढितात.
 आईबाप मुलांच्या कल्याणाविषयीं जे क्लेश भोगितात त्यांच- द्दल त्यांचे उपकार शंभर वर्षांनींसुद्धां फिटणार नाहींत.
 शहाण्या माणसानें कन्येचा पैसा थोडाहि घेऊं नये, पैसा घे- तल्यानें तो मुलें विकणारा होतो.
 बाप, भाऊ, पति, दीर वगैरे जे आपले कल्याण इच्छिणारे त्यांनी स्त्रियांस मान द्यावा, व त्यांस अलंकारभूषणें द्यावीं. जेथें त्रियांचा मान राहतो, तेथें देवता संतुष्ट राहतात. जेथें स्त्रियांचा मान राहत नाहीं, तेथे सर्व क्रिया निष्फळ होत. जेथें कुलस्त्रिया दुःखित असतात ते घराणें लवकर नष्ट होतें. जेथें त्यांस पीडा होत नाहीं त्या घराण्याची नेहमीं भरभराट होते. याकरितां क- ल्याण इच्छिणान्या लोकांनीं लग्नकार्य, उत्साह, इत्यादिकांच्या प्रसंगीं स्त्रियांचा मान ठेवावा, व त्यांस वस्त्रालंकार द्यावे.