पान:गद्यरत्नमाला.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
गद्यरत्नमाला.


देशांतहि आहे. याकरितांच कित्येक गोष्टींस मनूनें सनातन हा- टलें आहे. याकरितां त्रिकालाबाधित म्हणजे कधींहि ज्या धर्मीस दोष देतां येणार नाहीं, असे मनुस्मृतींतले धर्म मात्र येथे लिहिले आहेत.
 विषयाच्या संबंधानें मनुस्मृतीचे बारा भाग केले आहेत, व प्रत्येकास अध्याय असें म्हटलें आहे.
 अतिभोजन हे आरोग्य नष्ट करणारें, आयुष्य कमी करणारें, स्वर्गप्राप्तीस प्रतिकूल, पुण्यहानि करणारें, लोकविद्विष्ट असें आहे, याकरितां त्याचा त्याग करावा.
 सारथी घोड्यांस जसा स्वाधीन ठेवितो त्याप्रमाणें विद्वानानें आपली इंद्रियें स्वाधीन ठेवावीं. कारण, तीं आपणांस विषयां- कडे नेणारी आहेत.
 इंद्रियांच्याच संबंधानें मनुष्यांस दोष लागतो. तींच स्वाधीन ठेविलीं तर मनुष्यांस सिद्धि ( ह्म० धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ ) प्राप्त होते..
 विषयांची इच्छा उपभोगानें शांत होत नाहीं. होमद्रव्यानें अनि प्रज्वलित होतो तशी ती आणखी वाढते.
 ज्यास विषयसुख प्राप्त होईल व जो तें अनित्य आहे म्हणून सोडून देईल या दोहोंमध्ये सोडून देणारा श्रेष्ठ व अधिक सुखी होय.
 केवळ विषयोपभोग सोडिल्यानें इंद्रियें स्वाधीन होतात असें नाहीं, तर ज्ञानानें (नित्यानित्यवस्तुविवेकानें ) तीं सहज जिंकतां येतात.
 अनुकूल किंवा प्रतिकूल शब्द ऐकिल्यानें, स्पर्श झाल्यानें, पदार्थ भक्षण केल्यानें किंवा वास घेतल्यानें, जो आनंद किंवा दुःख यांत मग्न होत नाहीं तो जितेंद्रिय होय.
 भांड्याला भोंक पडलें म्हणजे जसें सर्व पाणी गळून जातें