लेल्या असत्या तर फार उपयोग झाला असता, व हजारों अत्यु- उत्तम ग्रंथ बुडाले त्यांचा कांहीं मागमूस तरी राहिला असता.
देशाची पूर्वस्थिती कळण्यास दोन साधने असतात. एक क लाकौशल्य आणि दुसरें विचार आमच्या देशाची पूर्वस्थिति कळण्यास इमारती, जयस्तंभ, वगैरे पुष्कळ गोष्टी होत्या, परंतु त्यांपैकी कित्येक यवनादि परकीय दुष्ट राजांनीं विश्वस्त केल्या, व कित्येक अग्नि, वायु, आप इत्यादि महाभूतांच्या सपाट्यांत सांडून कालांतराने नाहींतशा झाल्या. दुसरें साधन ह्मणजे वि चार, हे मात्र कांहीं आजपर्यंत राहिले आहेत. तेहि नष्ट व्हाव- याचे, परंतु सांप्रतच्या गुणज्ञ राज कत्यांच्या योगाने ते चिरस्थायी होतील असें वाटतें. परदेशस्थ लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षे खर्चून संसारसुखाची पर्वा न करून अहोरात्र श्रम करून संस्कृत भाषेतील ज्या सत्पुरुषांचे ग्रंथ शिकतात, त्यांचेच वंशज जर आपल्या पूर्वजांचे विचार कळण्याचा यत्न न करतील तर यापेक्षां अधिक शोचनीय गोष्ट कोणती? अस्तु.
व्याकरण, न्याय, वेदांत, वगैरे सर्व शास्त्रांची थोडथोडी मा. हिती देणें म्हटलें तरी एक स्वतंत्रच पुस्तक होईल. तें काम मोठ्या श्रमाचें व विद्वत्तेचें असल्यामुळे सहज होईल असें नाहीं. परंतु सर्वास अवश्य असें जें धर्मशास्त्र व ज्याचा नारा अथवा रूपांतर होत चाललें आहे, त्यांतील निवडक गोष्टी मासल्यादा- खल येथे लिहिल्या आहेत. प्राचीन काळीं भिन्नभिन्न देशांचे परस्परांत दळणवळण नव्हतें त्या वेळेस सर्व देशांत आचार, व्यवहार, न्याय, वगैरे सर्व गोष्टींचा समावेश धर्मशास्त्रांत करीत. अर्वाचीन काळी एका देशांत अनेक धर्माचे लोक, राजा व प्रजा यांचे धर्म भिन्न वगैरे गोष्टींमुळें आचार, व्यवहार, वगैरे गोष्टींचे पृथक्करण करून शरीर आणि मालमतेचें रक्षण होऊन देशांत शांति राहण्यास जेवढा आवश्यक भाग तेवढा मात्र राजांनीं आपल्या डे ठेविला आहे.