पान:गद्यरत्नमाला.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुस्मृति.

७७


ताकरितां ते कसे झटले असतील ह्या गोष्टी लिहिलेल्या असत्या, तर किती उपयोग झाला असता! किती सत्पुरुष देशांत उत्पन्न झाले असते ? किती लोकांचीं मनें सुधारली असती? शेंकडों लोक आळस व कुमार्ग टाकून उद्योग व सन्मार्ग यांकडे वळले असते, किंबहुना यवनादि परकीय लोकांनी जी देशाची दुर्दशा केली, ती होण्याचा प्रसंगदेखील आला नसता. प्राचीन काळच्या भरभ- राटीच्या वेळेचा इतिहास व वर सांगितलेल्या पुरुषांची चरित्रें नसणें ही एक दुर्दैवाची गोष्ट समजली पाहिजे.
 मनुष्यांपाशीं संपत्ति असली तर दुसन्यास लाभ होतो खरा; पण विद्येपासून इतरांस जो लाभ होतो, तो त्या लाभापेक्षां अनंत- पट मोठा आहे. संपत्तीचा लाभ तात्कालिक व इष्टमित्रांस मात्र; परंतु विद्येची गोष्ट तशी नाहीं. ज्ञानाचा लाभ; शत्रु व मित्र, तात्कालिक व पुढे उत्पन्न होणारे, या सर्वास सारखाच होतो. पहा, भोजविक्रम दि अत्युत्तम राजांच्या औदार्यादि गुणांपासून लाखों प्रजेचें हित झालें असेल यांत संशय नाहीं, तथापि कालि- दासादि नवरत्नांच्या ज्ञानानें जो आजपर्यंत एतद्देशीय व पर- देशीय लोकांस आनंद होत आहे, त्यांशीं त्या हिताची कितपत तुलना होईल ?
 इतिहास व सत्पुरुत्रांचीं चरित्रें नाहींत. ही एक हानिच आहे असें वर म्हटलें, तशीच दुसरी एक गोष्ट आहे, ती ही कीं, जी पूर्ण सुधारलेली संस्कृत भाषा आज जगांतील अनेक जुन्या व नव्या भाषांच्या मातृस्थान होऊन दंद्य झाली आहे, तिचा इति- हास आज किती हितावह झाला असता ! वेदापासून अलीकडील काव्यें, नाटके, यांपर्यंत जे भाषेमध्ये अनेक भेद दृष्टीस पडतात ते कसकसे व कोणकोणत्या कारणानें होत गेले, धर्मशास्त्र, वेदांत. शास्त्र, व्याकरणशास्त्र, न्यायशास्त्र वगैरे शास्त्रांवर जे जे उत्तम ग्रंथ झाले ते केव्हां झाले, हे ग्रंथ हो यापूर्वी त्या शास्त्रांचा अभ्यास कोणत्या रीतीनें चालत असे, वगैरे गोष्टी इतिहासरूपानें लिहि-