पान:गद्यरत्नमाला.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
गद्यरत्नमाला.


मनुस्मृति.

 एकादा मनुष्य विद्वान्, श्रीमान्, नीतिमान्, शूर, असला म्हणजे त्याच्या विद्या, ऐश्वर्य, नीति, शौर्य, इत्यादि गुणांनीं अनेक मनु- प्यांस मोठा लाभ होऊन त्याची कीर्ति देशोदेशी पसरते, व ती त्याच्या पाठीपागें चिरकाल राहते. असेंच देशाचें आहे, देशांत विद्वान्, श्रीमान्, सदाचरणी, शूर असे पुरुष झाले म्हणजे तो देश सर्व पृथ्वी भूषण होतो. असे प्राचीन काळीं भिन्न भिन्न वेळ पुष्कळ देश झाले, व त्यांत वर सांगितलेल्या प्रकारचे बहुत पुरुष उत्पन्न झाले. सांप्रतकाळींहि असे बहुत देश आहेत, व त्यांत वर सांगितलेल्या प्रकारचे मनुष्य आहेत. आपला देश हैं भरत- खण्डही प्राचीनकाळीं विद्या, कला, संपत्ति यांचे अधिष्ठान होऊन वर सांगितलेल्या विशेषणांस पात्र होऊन पृथ्वीवर आपले वर्चस्व मिरवीत होतें. त्याच्या सौंदर्यास भुलून दूर देशांतील लोक इकडे येत. अशा या देशांत विद्या, कला, ऐश्वर्य, यांची वृद्धि प्रारंभापासून कशी कशी होत गेली याचा इतिहास असता तर आज जगास के- वढा उपयोग झाला असता? सांप्रत गुणज्ञ लोकांच्या राज्यसत्त भरतभूमि असल्यामुळे तिच्या पुनरुज्जीवनास अशा इतिहासाचा उपयोग झाला असता. तसेंच जे मनु, व्यास, कपिल, पाणिनि, कात्यायन, पतंजलि, इत्यादि हजारों विद्वान् प्रतापी पुरुष या देशांत उत्पन्न झाले, कीं ज्या कालकटाहांत मोठमोठ्या सार्वभौम नृपांच राज्ये नष्ट झालीं त्या कालचक्रांतून निभावून ज्यांचे विचार जगांत अद्यापि आपला प्रकाश पाडीत आहेत, त्या पुरु- षांची चरित्रे साद्यंत लिहिलेली असती तर आज जगास केवढा उपयोग झाला असता ? हजारों वर्षे लोटली तरी ज्यांचे ग्रंथ आज सर्व सुधारलेल्या राष्ट्रांतील विद्वानांस मान्य होत आहेत, असे ग्रंथ लिहिणाऱ्यांचे ज्ञान केवढं असेल? एवढे ज्ञान संपादन करण्यास त्यांस किती श्रम करावे लागले असतील ? काय अडचणी आल्या असतील ? स्वसुखाकडे लक्ष न देतां परहि-