पान:गद्यरत्नमाला.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पितापुत्रसंवाद.

७५


 पुत्र -- बाबा, असें अनुमान प्राचीन काळीं कोणीं केलें १ व शाब्दज्ञानानें ईश्वर कोणास कळला ?
 पिता - मुला, प्राचीन काळी गौतम, काणाद, इत्यादि ऋपनी सृष्टिज्ञानापासून ईश्वराचे अनुमान केलें. तसंच व्या- सादि ऋपींस शाब्दज्ञानानें ईश्वरज्ञान झालें. या सर्वांनी मनु- ष्यांस ईश्वरप्राप्ति व्हावी ह्मणून परोपकारार्थ अत्युत्तम ग्रंथ लिहून ठेविले आहेत.
 पुत्र बाबा, सृष्टि रचनेचा विचार करून काय होईल?
 पिता - मुला, त्यापासून मोठा लाभ व आनंद आहे. परमे- श्वराने पांचभौतिक जग उत्पन्न करून त्याचें सौंदर्य अनुभविण्यास पांच ज्ञानेंद्रिये व सहावें मन हीं त्यानें मनुष्यांस दिलीं आहेत. पुत्र बाबा, सृष्टिरचनेचा विचार करून विद्वानांस मात्र आनंद होत असेल.
 पिता – मुला, सृष्टि रचनेवरून ईश्वराचे महत्त्व मनांत येण्यास मोठी विद्या पाहिजे असें नाहीं. तिकडे लक्ष मात्र पाहिजे. सूर्योदय झाला ह्मणजे सर्व विश्व प्रकाशित होते, पर्जन्य पडून पृथ्वी फलपुष्पयुक्त होऊन सर्व प्राण्यांचे रक्षण होतें, या गोष्टी पंडित आणि शेतकरी या उभयतांच्याही मनांत येतात व त्यांपा- सून दोघांच्याही अंतःकरणांत ईश्वराचा महिमा उभा राहतो, अनंतशक्ति ईश्वराने सर्व वस्तु अपरिमित चातुर्यानें मनुष्यांस हितकारक अशा केल्या आहेत.
 पुत्र -- बाबा, सर्व वस्तूंमध्ये ईश्वराचा कृपाळूपणा,चातुर्य, आणि शक्ति, हीं दिसतात काय ?
 पिता -- मुला, बहुतेक ठिकाणी दिसतात. कित्येक ठिकाण दिसणार नाहींत, तर ही आमची पाहाणारांची न्यूनता होय. आंध- ळ्यास दिसत नाहीं म्हणून सूर्य कमी प्रकाशित आहे, असें नाहीं.