पान:गद्यरत्नमाला.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरी.

६३


मत्त झालीं आहेत, अशा दुर्जनांचा दांडगेपणा माझ्यानें सोस- वत नाहीं.
 कोणी पंडित राजास म्हणतो - तूं द्रव्याचा मालक आहेस, आह्मांजवळ सरस्वती आहे. तूं शूर आहेस, वाद करणाऱ्यांचा गर्वरूप ज्वर घालविण्याविषयीं आह्मीहि कुशल आहों. मोठमोठे श्रीमान् लोक तुझी सेवा करितात, बुद्धीचा मळ घालविण्याक- रितां जिज्ञासु आमचीहि सेवा करतात. आमची तुला गरज नसेल तर तुझीहि आह्मांला नाहीं, हा मी चाललों.
 कोणी साधु राजास म्हणतो- आह्मी वल्कलांनीं संतुष्ट आहों, तूं वस्त्रांनीं संतुष्ट आहेस, तुझा आमचा संतोष सारखाच. मग भेद कोठें आहे ? ज्याचा लोभ मोठा तो दरिद्री मन संतुष्ट असल्यावर धनवान् कोण आणि भिकारी कोण ?
 धन्याची चाकरी करणे कठीण, राजाचें चित्त फार चंचल, आमची इच्छा तर मोठी, मोक्षाकडे आमचें मन लागलें आहे, जरा देहाचा नाश करते, मृत्यु सर्व जीवित हरण करतो, याक- रितां मित्रा, विद्वानांला तपाशिवाय दुसरें कांहीं श्रेयस्कर नाहीं.
 विषय, मेघाच्या आच्छादनांत हालणाऱ्या विजांप्रमाणें चंचल; आयुष्य, वायूनें फाटलेल्या अभ्रांतील पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणें क्षणभंगुर; तारुण्यहि फार चंचल, असें मनांत आणून बुधहो, धैर्य आणि समाधि यांच्या योगानें सुलभ असा जो योग त्याकडे मन लावा.
 कोणीएक आपल्या पूर्वीच्या मित्रास ह्मणतो, तुझी आह्मी, आह्मी तुझी, अशी आपली बुद्धि होती; आतां काय झाले ? जे- करून तुह्मी तुझी, आह्मी आह्मी असें झालें.
 आयुष्य जलतरंगाप्रमाणें चंचल, तारुण्यहि थोडे दिवस राह- जायें, धनहि क्षणभंगुर, विषयोपभोग पावसांतल्या विद्युल्लतेप्रमाणें चंचल, स्त्रीसुखहि क्षणिक, याकरितां जनहो, संसार हाच कोणी भयसमुद्र, हा तरण्याकरितां ब्रह्माकडे चित्त लावा.