पान:गद्यरत्नमाला.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
गेयरत्नमाला.


 ही वेळ नाहीं, महाराज रंगमहालांत निजले आहेत. बरें, उठल्यावर भेट होईल ? छे, रावसाहेब रागावतील. अशीं ज्या दारांत भाषगे होतात, त्यांस टाकून हे चित्ता, विश्वेश्वर जो देव त्याच्या घरीं जा, तेथें द्वारपालाचीं निर्दय कठोर भाषणें नाहींत. तें घर अनंत कल्याण करणारे आहे.
 जरा वाघिणीसारखी भय दाखवीत उभी आहेच, शत्रूप्रमाणें रोग शरिरावर प्रहार करितातच आहेत, फुटलेल्या भांड्यांतून पाणी पाझरतें त्याप्रमाणें आयुष्य क्षीण होतच आहे; तथापि लोक दुराचरण करतात, हैं मोठे आश्चर्य आहे !
 जो जितेंद्रिय, शान्त, समचित्त, ज्याचें मन सदा संतुष्ट, तो दरिद्री असला तरी सर्व ठिकाणीं त्याला सुखच आहे.
 लक्ष्मी चंचल, आयुष्य चंचल, तारुण्य चंचल; अत्यंत चंचळ अशा संसारामध्ये एक धर्म मात्र स्थिर आहे.

प्रश्नोत्तरमालिका.


 प्रश्नोत्तररूपानें उपदेश करणें ही पद्धति भरतखंडांत प्राचीन कालापासून आहे. वेदांतहि अनेक ठिकाणीं प्रश्नोत्तररूपानें कि- त्येक विषय वर्णिले आहेत. या वेदांतील प्रश्नोत्तरांस ' वाको- वाक्य ' असें प्राचीन संस्कृत ग्रन्थकार ह्मणतात. जगन्मान्य परमपूज्य वेदधर्मरक्षक श्रीमच्छंकराचार्यांनीं प्रश्नोत्तरमालिका या नांवाचें एक लहान उपदेशप्रकरण गुरुशिष्यसंवादरूपानें लिहिलें आहे, त्यांतील प्रश्नोत्तरें फारच उत्तम आहेत, तीं वाच- कांच्या उपयोगा करतां येथें देतों.
 शिष्य गुरूस ह्मणतो:-

प्रश्न.
उत्तर.
 


१ महाराज, घ्यावे काय ?
गुरूचें वचन.
 

२ टाकावें काय ? वाईट कृत्य.