पान:गद्यरत्नमाला.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
गद्यरत्नमाला.


केलें, तरी हे तृष्णे, अजून वाढतेस; हे चांडाळिणी, तूं अद्याप संतुष्ट होत नाहींस.
 दुष्टांचीं बोलणीं सोसलीं, त्यांस संतुष्ट करण्याकरितां कसेंहि करून रडें मनांत दाबून मनांत कांहीं नसतां हंसलों. मन स्थिर करून त्यास हातहि जोडले. तथापि हे आशे, अजून तूं मला कां नाचवितेस ?
 सूर्याच्या उदयास्तांनी आयुष्य क्षीण होत आहे; ज्यांत पुष्कळ मोठमोठ्या खटपटी आहेत, अशा अनेक व्यापारांच्या योगानें काल कसा जातो हें समजत नाहीं; जन्म, जरा, मरण पाहून त्रास उत्पन्न होत नाहीं; तस्मात् मोहरूप मद्य प्राशन करून सर्व जग उन्मत्त झालें आहे, असें म्हटलें पाहिजे.
 उपभोगाची इच्छा निवृत्त झाली; अभिमान गेला; बरोबरचे जिवलग मित्र स्वर्गात गेले; काठी धरून सुद्धां उभे राहण्याची पं- चाईत पडूं लागली; तथापि हा निर्लज्ज देह मरणाला भितोच.
 तोंडाला सुरकुत्या पडल्या, केश पिकले, इंद्रियें शिथिल झालीं, एक तृष्णा मात्र तरुण आहे.
 बहुत काळपर्यंत उपभोग केला तरी विषय जावयाचेच; मग लोक स्वतःच का टाकीत नाहींत ? स्वतः टाकण्यास कोणती हरकत आहे ? इतकाच भेद कीं, नाहींतसे झाले म्हणजे मनास फार दुःख देतात आणि आपण होऊन टाकिले असतां अनंत असें शांतिसुख देतात.
 प्रभाव ठाऊक नसल्यामुळें शलभ दिव्यांत पडतो, मासा अज्ञानाने गळांत सांपडतो, तेंहि असो; परंतु आह्मी शहाणे म्हणविणारे अनेक विपत्तींनी युक्त अशा विषयांप्रत टाकीत नाहींत. तस्मात् मोहाचा महिमा अगाध आहे.
 खाण्यास फळें, पिण्यास गोड पाणी, निजण्यास जमीन, आणि पांघरण्यास वल्कलें पुरे; पण धनरूप मद्यानें ज्यांचीं सर्व इंद्रिये