पान:गद्यरत्नमाला.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
गद्यरत्नमाला


त्यापाशीं न मागणें, संकटकाळीं धैर्य धरणें, थोर जातील त्या मार्गानें जाणें, हें तरवारीच्या धारेसारखें कठीण व्रत साधूला कोणीं रांगितलें ?
 चक्राप्रमाणें भ्रमण करणाऱ्या संसारामध्ये कोण मरून उत्पन्न होत नाहीं ? ज्याच्या योगानें कुल उदयास येतें त्यासच जन्मला असे म्हणावें.
 सर्व इंद्रिये तींच, कर्म तेंच, अकुंठित अशी बुद्धि तीच, बो- लणें तेंच, मनुष्य तोच, परंतु द्रव्याचा उबारा नाहींसा झाला म्हणजे क्षणांत बदलून जातो, हें मोठें आश्रर्य आहे !
 वाईट प्रधान असले म्हणजे राजा नाश पावतो; साधु विषय- संगानें नाश पावतो; मुलगा लाडांनीं नासतो; ब्राह्मण विद्याभ्यास न केल्यानें नासतो; कुल वाईट मुलगा निपजल्याने नासतें; दु- ष्टांच्या सहवासानें स्वभाव बिघडतो; मद्याच्या योगानें लजा नाहींशी होते; देखरेख न केल्यानें शेतकी बिघडते; प्रवासास गेल्यानें प्रेम नाहींसें होतें; अप्रीतीनें मित्रत्व नाहींसें होतें; उधळे- पणा व उन्मत्तपणा यांच्या योगानें द्रव्य नाहींसें होतें.
 दान, उपयोग, नाश, ह्या धनाच्या तीन अवस्था आहेत. जो देत नाहीं, व उपभोगहि घेत नाहीं, त्याच्या धनाची तिसरी अवस्था होते.
 निर्दयपणा, कारणाशिवाय भांडण, परधन आणि परस्त्री यांची इच्छा, सज्जन आणि भाऊबंद यांचा हेवा, हे दुर्जनांचे स्वाभा विक दुर्गुण आहेत.
 दुर्जन विद्वान् असला तरी त्याचा त्याग करावा. सर्प रत्नानें भूषित असला तरी, तो भयंकर नाहीं काय ?
 नम्र असला म्हणजे मूर्ख, व्रत करणारा असला म्हणजे ढोंगी, स्वच्छ वागणारा असला म्हणजे लुच्चा, शूर असला म्हणजे निर्दय, सरळ असला म्हणजे अप्रबुद्ध, वक्ता असला तर बडबड्या,शांत