पान:गद्यरत्नमाला.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरि

५७


असला म्हणजे अशक्त, याप्रमाणें गुणवानांचा असा कोणता गुण आहे की, ज्यास दुर्जनांनीं नांव ठेविलें नाहीं ?
 लोभ असेल तर दुसरा दुर्गुण कशास पाहिजे ? पिशुनता असल्यावर दुसरीं पातकें कशास पाहिजेत ? सत्य असेल तर तपाचें काय करावयाचे आहे ? मन शुद्ध असेल तर तीर्थास जाण्याची काय गरज? अंगीं भलेपणा असला तर दुसरे गुण काय करा- वयाचे १ कीर्ति असली तर अलंकाराची काय गरज? चांगली विद्या असली म्हणजे आप्तांचे काय कारण? अपकीर्ति असेल तर मरण कशास पाहिजे ? आहाराचा नियम असला तर वैद्य कशास पाहिजे ?
 बोलला नाहीं तर मुका, बोलला तर बडबड्या, सहनशील असला तर भित्रा, नाहीं तर हलकट, जवळ उभा राहिला तर दांडगा, नाहीं तर भेकड. एकंदर तात्पर्य इतकेंच कीं, दुस- याची चाकरी करणे फार कठीण आहे. मोठ्या योग्यांना देखील तें साधावयाचें नाहीं.
 सकाळच्या सावलीप्रमाणें पहिल्याने मोठी व मग कमी होत जाणारी अशी दुष्टांची मैत्री असते. सज्जनांची सन्ध्याकाळच्या सावलीप्रमाणे पहिल्यानें कमी व मग वाढत जाणारी अशी असते.
 हरिण तृणावर उपजीविका करतात, मासे जलप्राशन करून राहतात, साधु सर्वदा संतोष धारण करून राहतात, तथापि पारधी, कोळी आणि दुर्जन हे त्यांचे विनाकारण शत्रु बनले आहेत.
 सत्संगाची इच्छा, दुसन्यांच्या गुणांवर प्रीति, गुरूविषयीं न म्रता, विद्येचें व्यसन, स्वस्त्रीची आवड, लोकापवादाचें भय, ई- श्वरावर भक्ति, मनाचा निग्रह करण्याविषयीं शक्ति, कुसंगतिचा त्याग,है निर्मळ गुण ज्याचे ठायीं वास करितात, त्या पुरुषांस नमस्कार असो.
 विपत्तीत धैर्य, भरभराटीच्या वेळेस क्षमा,सभेमध्ये वाक्पटुत्व