पान:गद्यरत्नमाला.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
गद्यरत्नमाला.


( सर्वोच्या ) स्वाधीन आहे, असें एक साधन निर्माण केलें आहे.
 जेव्हां मला थोडे कळत होतें, तेव्हां एक हत्तीसारखा मदांध झालों, व सर्व मला समजतें असा मनांत गर्व वहात होतों. परंतु जेव्हां विद्वानांपासून थोडथोडें शिकत गेलों, तेव्हां मी मूर्ख आहें, अशी खातरी होऊन अंगांतला जसा ताप जावा तसा माझा ताठा नाहींसा झाला.
 जलाच्या योगानें अग्नीचें निवारण करितां येईल. उन्हाचे छ. त्रीनें निवारण करितां येईल; माजलेल्या हत्तीचें तीक्ष्ण अंकुशानें; बैल, गाढव, यांचे सोट्यानें निवारण करितां येईल; रोग औष- धांनी बरा करितां येईल; मंत्राच्या योगानें विष काढतां येईल; सर्वोला शास्त्रांत औषध सांगितलें आहे; परंतु मूर्खाला मात्र औषध नाहीं.
 विद्या, संगीत, कला, ह्रीं ज्यांस नाहींत तो पुच्छशृंगरहित असा प्रत्यक्ष पशुच होय. तो गवत न खातां वांचतो; हैं पशूंचे मोठें दैव समजलें पाहिजे.
 ज्यांस विद्या नाहीं, तप नाहीं, दान नाहीं, ज्ञान नाहीं, चां गला स्वभाव नाहीं, गुण नाहीं व धर्म नाहीं, ते पृथ्वीस भारभूत असे पशुच मनुष्याच्या रूपानें फिरतात.
 अरण्यें, गुहा, यांत पशूंबरोबर राहणें बरें, परंतु इंद्राच्या घरीं राहूनहि मूर्खाशीं सहवास नसावा.
 राजे हो, जें चोराला दिसत नाहीं, सर्वकाळ जें उत्तम सुख देतें, याचकांस दिले तरी वाढतें, कल्पांतींही नाहींसं होत नाहीं; असें जें विद्यारूप धन तें ज्यांपाशीं आहे त्यांस मान द्या. त्यांशीं कोण स्पर्धा करील ?
 बाहुभूषणें, चन्द्रासारखे प्रकाशित हार, स्नान, चंदन, पुष्पें, चांगले केश, हीं पुरुषांस शोभवीत नाहींत ; संस्कारयुक्त अशी वाणी जवळ असली, तर ती एकटीच पुरुषांस शोभा आणिते. इतर भूषणे नेहमी झिजतात, वाणी हें मात्र खरें भूषण होय.