पान:गद्यरत्नमाला.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरि

५३


गेलें होतें, यामुळे तिला संतुष्ट करण्याकरितां त्यानें तें फळ तिला दिलें. ह्या स्त्रीचें राजावर मन गेलें होतें, म्हणून राजाची प्रीति संपादण्याकरितां, तिनें तें फळ राजास नजर केलें. फळ पाहतांच राजा चकित झाला. शोध केल्यावर वरील हकीकत त्यास कळली. तेव्हां राजा खिन्न होऊन सर्वसंगपरित्याग करून, वैराग्य धारण करून मोक्षमार्गाचें साधन करूं लागला. या गोष्टींत तथ्यांश किती असेल तो असो; परंतु दंतकथेचा भागहि पुष्कळ असावा असें वाटतें. नीति आणि वैराग्य या शतकांवरून पाहिलें तर, भर्तृहरि मोठा नीतिमान् आणि विरक्त असावा, असें दिसतें.
 अत्यंत रूपवान् पुरुष सर्व अलंकारांनीं युक्त पाहिला, आणि तोच पुनः अलंकारविरहित पाहिला तर त्याच्या सौंदर्याच्या आल्हादजनकतेंत पुष्कळ भेद पडेल. तथापि आल्हादजनकता नाहींशी होणार नाहीं. कवितेचें जीवित अर्थ होय. तोच अर्थ अलंकारांनीं भूषित असला म्हणजे, फारच आनंद देतो. गद्यरूपानें तो लिहिला म्हणजे त्याचें सर्व कृत्रिम सौंदर्य नाहींसें होतें, तथापि त्याच्या स्वाभाविक सौंदर्यापासून वाचकांस आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं; असें वाटून त्या शतकांतील थोडे मासलेदार विचार येथें गद्यरूपानें लिहितों :-
 ज्यास समजत नाहीं, अशाचें समाधान सहज होतें. जो चां- गला सुजाण आहे, त्याचें समाधान फारच लौकर होतें. पण जो थोड्याशा ज्ञानानें करपटलेला ( आपणास शहाणा समजणारा ) त्याचें समाधान ब्रह्मदेवाच्य नेंहि होत नाहीं.
 मगराच्या दाढेत गेलेलें रत्न बलात्कारानें काढितां येईल; प्र- चंड लाटांनी भरलेला समुद्र तरून जातां येईल; रागावलेल्या सापास फुलाप्रमाणे डोक्यावर धारण करितां येईल; परंतु दुराग्रही मूर्ख मनुष्याचें समाधान व्हावयाचें नाहीं.
 मौन हैं विद्वान् लोकांच्या मंडळीमध्यें अज्ञान झांकण्यासाठी मूर्ख जनाकरितां, ब्रह्मदेवानें ज्याचा गुण निश्चित आहे, व जें