पान:गद्यरत्नमाला.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
गद्यरत्नमाला.


दोन्ही एकत्र वास करीत नाहींत, अशी हाण आहे; तिला भर्तृ- हरि हा मोठाच अपवाद होय. श्रीमंतांच्या अंगी थोडीशी विद्या असली तरी गरीवाच्या अंगच्या मोठ्या विद्येपेक्षां तिचा मोठा लौकिक होतो; अशा प्रकारचा भर्तृहरि विद्वान् होता असें नाहीं. व्याकरणशास्त्रासारख्या गहन विषयावरचेहि ज्याचे ग्रंथ ऋषिप्रणीतग्रंथांसारखे शेंकडों वर्षे प्रमाणभूत झाले आहेत. अशा पुरुषाची विद्वत्ता किती वर्णावी ! भर्तृहरीच्या चरित्राचा राजांस व इतरांस फार उपयोग झाला असता. त्याचें चरित्र साद्यंत लिहिलेलें नाहीं इतकंच नाहीं, तर त्य विषय ज्या दंतकथा आ हेत त्याही परस्परांस फार विरुद्ध असल्यामुळे सर्वच संशयाई झाल्या आहेत. लक्ष्मी आणि सरस्वती यांप्रमाणें तत्त्वज्ञता आणि रसिकता एकत्र वास करीत नाहींत, असा सामान्य नियम लोक समजतात; तोही भर्तृहरीच्या नांवानें बाधित करून टाकिला. भर्तृहरि जसा उत्तम शास्त्रज्ञ तसा पहिल्या प्रतीचा कविहि होता. त्यानें केलेले काव्यग्रंथ बहुतेक नाहींतसे झाले. शृंगार, नीति, आणि वैराग्य या नांवाचीं तीन शतकें मात्र लोकप्रसिद्ध आहेत. या शतकांनी या राजकवीचें नांव अमर केलें आहे हाटलें तरी चालेल, नीतिशतकाच्या आरंभी एक श्लोक आहे त्याचा अर्थ येणेंप्रमाणे:-
 "जिचे मी मनांत चिंतन करितों, ती मजविषयीं विरक्त, ती दुसन्याच माणसाची इच्छा करिते. त्याचेही मन तिसरी- वरच, कोणी एक स्त्री मजकरितां उत्सुक आहे. याकरितां तिला, त्याला, मदनाला, हिला, मला, सर्वांस धिक्कार असो.
 ह्या लोकावरून भर्तृहरि विषयीं एक चमत्कारिक गोष्ट सांग- तात. ती अशी – एका समयीं एका तपस्व्याने भर्तृहरिराजास प्रासादिक फळ आणून दिलें. राजाची बायकोवर फार प्रीति असे, म्हणून त्यानें तें तिला दिलें. तिचीहि एका पुरुषाचे ठायीं प्रीति जडली होती, त्यास तिनें तें फळ दिलें. त्याचें एका स्त्रीवर मन